प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर-कापसखेड रस्त्यालगत एका ३५ ते ४० वर्षीय इसमाचा डोक्यात व तोंडावर दगड घालून खून झाला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. मात्र मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. कापुसखेड रस्त्यालगत मधल्या टेकडीचा माळ या परिसरात ही घटना घडली आहे. हा परिसर निर्जन आहे. घटनास्थळी पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी भेट दिली.

