Tarun Bharat

इस्लामपुरात मासे विक्रेत्या तरुणाचा निर्घृण खून

इस्लामपूर / प्रतिनिधी

येथील मायक्का मंदिरापाठीमागील उरूणवाडी रस्त्यावर रात्री उशिरा पाठलाग करून अक्षय अशोक भोसले (वय २८ रा. उरुणवाडी ) या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने पोटात वार करून खून केला.ही घटना गुरुवारी रात्री घडली.आर्थिक देव-घेवीतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ; मृत अक्षय याचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे.बुधवारी मटण मार्केट परिसरात दुकानातून तिघा मित्रांनी कोळंबी खरेदी केली होती.त्याची काही उधारी ठेवून ते निघून गेले होते.गुरुवारी पुन्हा तेच तिघे जण मासे न्यायला आले होते.अक्षय याने कालचे पैसे द्या, असे म्हणत वाद झाला होता. त्यानंतर हे निघून होते.

मासे विक्री करून अक्षय हा दुचाकी ( एमच १० – डीएच ९५२७ ) वरून घरी निघाला होता. आंबेडकर नाका येथून येडेनिपाणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर उरूणवाडी जवळ ओढ्याजवळ गाडी लावून मामा किरण पवेकर यांचेशी फोनवरून बोलत होता. मासे विक्रीसाठी तो ऑर्डर देत होता. याचवेळी अज्ञातांनी अक्षय वर खुनी हल्ला चढवला. तेव्हा जिवाच्या आकांताने ओरडत पळत सुटला. तीनशे फुटावर तो हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. त्याला खाली पाडून
तीक्ष्ण हत्याराने पोटात खोलवर वार केले होते. पोटातून आतडी बाहेर आली होती. हल्लेखोरांनी पलायन केले. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट दिली.

Related Stories

सांगली : विमा कंपन्यांकडून शेतकरी वाऱ्यावर!

Archana Banage

Sangli : विनयभंग, जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

Abhijeet Khandekar

सांगली : म्हैसाळ बनले कोरोना हॉटस्पॉट, पाचशेहून अधिक बाधित

Archana Banage

सांगली : कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी आता जनता दलाची हेल्पलाईन

Archana Banage

एमबीबीएस प्रवेश निश्चित करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवली

Archana Banage

नांद्रेयात पूरग्रस्तांसाठी लोकप्रतिनिधी व तलाठी यांच्यात वादावादी

Archana Banage