Tarun Bharat

इस्लामपूर आगारात शिवसेना व रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात दगडफेक

प्रतिनिधी/इस्लामपूर

महाराष्ट्रात एसटी बसचे आंदोलन सुरु असतानाच वाळवा तालुक्यातील ताकारी येथे इस्लामपूर आगाराची एसटी बस क्रमांक एमएच १० एन ८२९६ या एसटीवर दगड फेक करण्यात आली आहे. रयत क्रांतीचे कार्यकर्ते नंदकुमार पाटोळे यांना या प्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान इस्लामपूर आगारात शिवसेना व रयत क्रांती संघटनेच्या गटात दगडफेक झाली. शिवसेनेचे कार्यकर्ते इस्लामपूर आगारात एसटी बसेस सोडण्यासाठी कार्यरत होते. दरम्यान रयत क्रांतीचे नेते सागर खोत यावेळी १०- १२ कार्यकर्त्यांसह एसटी बस वाहतूक रोखण्यासाठी आगारात घुसले. यावेळी दोन गटात दगडफेक झाली आहे. रयत क्रांतीचे सागर खोत यांच्यासह १० ते १२ कार्यकर्त्यांना तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

कोरोना मुकाबल्यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानला 60 लाख डॉलर्स

datta jadhav

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Anuja Kudatarkar

कणेरी येथील यश बेकरीमध्ये चोरी

Abhijeet Khandekar

जम्मू काश्मीर मध्ये चकमकीत 5 जवान शहीद, 5 दहशतवाद्यांचा खात्मा

prashant_c

Sangli: प्लॅस्टिक कारखान्याला भीषण आग; ५ तासांनी आग नियंत्रणात

Abhijeet Khandekar

इटली, स्पेन, फ्रान्समध्ये गंभीर संकट

tarunbharat