Tarun Bharat

इस्लामिक दहशतवादाच्या विरोधामधील फ्रान्सची मोहीम थांबणार नाही!

पॅरिस

 फ्रान्समध्ये शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये पॅरिस जवळील रामबॉलेटमधील हल्लेखोराने पोलीस ठाण्यामध्ये घुसुन एका महिला पोलीस अधिकाऱयाची धारधार हत्याराने वार करुन गळा चिरुन हत्या केली आहे. हत्या झालेल्या महिला पोलीस अधिकाऱयाचे नाव स्टेफनी असून त्यांना दोन मुले असल्याचीही माहिती आहे. हल्लेखोर हा टय़ुनिशियामधील असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. यानंतर सदर घटनेची गंभीर दखल घेत फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युल मॅक्रोन यांनी म्हटले, की या हल्ल्यामुळे आमची इस्लामिक दहशतवादासोबतची लढण्याची मोहीम कधीच थांबणार नसून यापुढेही कडक भूमिका घेणार असल्याचा इशारा यावेळी राष्ट्रपती मॅक्रोन यांनी दिला आहे. हल्लेखोर हा अधिकृत कागदपत्रासोबत वास्तव्य करत असल्याची माहिती आहे. त्याचे अन्य कारनामे शोधण्याचे कामही पोलीस करत असून लवकरच मुख्य सुत्रधारांना ताब्यात घेणार असल्याचा विश्वासही यावेळी तपास अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

ट्रम्प विरोधात पुन्हा लढणार : बायडेन

datta jadhav

आयएसआय ब्रिगेडियरची दहशतवाद्यांकडून हत्या

Patil_p

जगात 800 कोटीव्या मुलाचा जन्म

Amit Kulkarni

युक्रेनच्या 7 शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले

Amit Kulkarni

पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता कायम

Patil_p

आजीसाठी खोटी ‘आई’च केली उभी

Amit Kulkarni