Tarun Bharat

इ. 7 वी ते 9 वीची परीक्षा रद्द

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  ऐन परीक्षा काळातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परिणामी 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करुन कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाने इ. 7 वी ते इ. 9वी च्या परीक्षा रद्द करण्यात असल्याचे  जाहीर केले असून एसएसएलसी परीक्षचे वेळापत्रक 14 एपिल नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचा आदेश बजाविण्यात आला आहे.

2019-2020 या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षेच्या काळातच कोरोनामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परिणामी इ. 1 ली ते 6 वी च्या परीक्षा देखील अपुर्णच राहिल्या, सदर इयत्तेच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन पुढील शैक्षािrणक वर्षात नवीन इयत्तेत प्रवेश देण्यात यावा असे जाहीर करण्यात आले. मात्र इ. 7 वी ची बोर्डांची परीक्षा व इ. 8 वी व 9 वी परीक्षेबाबत निर्णय प्रलंबित होता.  गुरुवारी कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाचे शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी इ. 7 वी ते 9 वीची परीक्षा घेण्यात येणार नसून दहावी परीक्षेची तारीख लॉकडाऊन उठताच तात्काळ कळविण्यात येईल असे जाहीर केले आहे.

यामुळे इ. 7 वी ते 9 वीची परीक्षा होणार की नाही संभ्रमावस्थेत असणाऱया विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने दिशा मिळाली आहे.

Related Stories

‘ऐतिहासिक निर्णय’: बी.एस.येडियुरप्पा यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Abhijeet Khandekar

गणेश मूर्तीच्या उंचीबाबत अद्याप संभ्रम

Amit Kulkarni

विविध अटींच्या बडग्याने पक्षकारांचे अतोनात हाल

Patil_p

बसस्थानक आवारातील रस्त्यांची दुर्दशा

Amit Kulkarni

बलात्कार प्रकरणी पोलिसाची वैद्यकीय तपासणी

Patil_p

मनपाकडून दिव्यांगांना लवकरच वाहन वितरण

Amit Kulkarni