Tarun Bharat

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने राऊत यांचे अलिबागमधील आठ प्लॉट आणि दादरमधील राहता फ्लॅट जप्त केला आहे. या कारवाईवर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचं राहातं घर ईडीने जप्त केलं आहे. अन् भाजपचे लोकं आनंदाने उडय़ा मारत आहेत, कोणी फटाके वाजवत आहे. मराठी माणसाचा एक हक्काचा फ्लॅट जप्त केल्याने त्यांना आनंद झाला. राजकीय सूड आणि बदला कोणत्या थराला जाऊन कारवाया होतात, हे आज पहायला मिळत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले, ईडीकडून जप्त करण्यात आलेले आठ प्लॉट मिळून एक एकरही जागा नाही. आमच्या नात्यातल्या लोकांनी अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या छोटय़ा छोटय़ा जागा आहेत. आता ईडीला ते मनीलाँड्रींग दिसायला लागलं आहे. 2009 मध्ये आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली जागा आणि घर त्याची साधी आमच्याकडे कुणी चौकशी केली नाही. एक रुपया जरी मनीलाँड्रींग प्रकरणातला पैसा आमच्या खात्यात आला असेल तर सर्व प्रॉपर्टी आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत, असेही राऊत म्हणाले.

Related Stories

नाना पटोलेंना पदावरुन हटवा; विदर्भातील 24 नेत्यांची मागणी

datta jadhav

मुंबई हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईदला 10 वर्षाचा कारावास

Tousif Mujawar

देशातील रूग्णसंख्या दीडलाख पार

Patil_p

उत्तराखंडमध्ये 34 नवे कोरोना रुग्ण; एकूण आकडा 1819 वर

Tousif Mujawar

उद्धव ठाकरेंचे पद बेकायदेशीर; शिंदे गटाच्या वकिलाचा आयोगापुढे दावा

Abhijeet Khandekar

कोरोनानंतर आता मुंबईवर म्युकरमायकोसिसचे संकट

Tousif Mujawar