Tarun Bharat

ईयूमधील सात देश आणि स्वित्झर्लंडमध्ये कोविशिल्ड लसीला मंजूरी


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम


सीरम इन्स्टिट्यूच्या कोविशिल्ड लसीबाबत युरोपियन युनियनमध्ये वाद सुरू आहे. युरोपियन युनियनने कोविशिल्ड लसीला मंजुरी दिली नसल्यामुळे भारतीय नागरिकांना ‘ग्रीन पास’ मिळणे अवघड झाले आहे. यामुळे युरोपात जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. पण आता युरोपात जाणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. युरोपीय संघातील सात देश आणि स्वित्झर्लंडने कोविशिल्ड लसीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता भारतीयांचा युरोपात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

युरोपियन युनियननं आपल्या ग्रीन पास योजनेच्या अंतर्गत प्रवासावरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोविशील्ड आणि कोवॅक्सिनची लस घेतलेल्या भारतीयांना युरोपचा प्रवास करू द्या, असं आवाहन भारत सरकारकडून युरोपियन युनियनला करण्यात आलं आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. ‘ग्रीन पास असलेल्या युरोपियन नागरिकांना आम्ही अनिवार्य क्वारंटिनमधून सवलत देऊ. पण यासाठी एक अट आहे. तुम्ही कोविशील्ड आणि कोवॅक्सिनला मंजुरी द्या,’ असं भारताकडून युरोपियन युनियनला सांगण्यात आलं आहे.


आतापर्यंत ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोवेनिया, ग्रीस, आईसलँड, आर्यलंड, स्पेन आणि इस्टोनिया यांनी कोविशील्ड लसीला मंजुरी दिली आहे. याशिवाय स्वित्झर्लंडच्या शेंगेन राज्यातही कोविशील्ड लस घेतलेल्यांना कोणत्याही निर्बंधांचा सामना करावा लागणार नाही. इस्टोनियामध्ये कोविशील्डसोबतच कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीय नागरिकांना कोणतीही बंधनं नसतील.


युरोपियन युनियनची डिजिटल कोविड प्रमाणपत्र योजना किंवा ग्रीन पास योजना आज, गुरुवारपासून अंमलात येईल. युरोपियन मेडिसिन्स एजेंसीची मान्यता असलेल्या लस घेतलेल्यांना ईयूमधील प्रवासी निर्बंधपासून सूट देण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिलेल्या लसी स्वीकारण्याचे स्वातंत्र्य सदस्य देशांना देखील आहे.

Related Stories

“हिंमत असेल तर अफगाणिस्तानात जा आणि…”; आमदार भातखळकरांचे जावेद अख्तरांना आव्हान

Archana Banage

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदांच्या आरक्षणाची मार्गसूची जारी

Patil_p

दिल्लीत आजपासून 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी ‘जहां वोट, वहां वैक्सिनेशन’ अभियान

Tousif Mujawar

राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी : प्रवीण दरेकर

Tousif Mujawar

लखनौनजीक अपघातात 9 जणांचा मृत्यू, 3 बेपत्ता

Patil_p

देशातील लॉकडाऊन वाढवण्याची आयसीएमआरची केंद्राकडे शिफारस

datta jadhav