Tarun Bharat

ईशा गुप्ताचे इन्स्टाग्रामवर 7 दशलक्ष फॉलोअर्स

Advertisements

अभिनेत्रीने चाहत्यांचे विशेष शैलीत मानले आभार

ईशा गुप्ता ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ईशा सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते आणि स्वतःच्या बोल्ड छायाचित्रांद्वारे चर्चेत राहते. अभिनेत्रीच्या छायाचित्रांना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असतो. ईशाला स्वतःच्या बोल्डनेसमुळे कधीकधी ट्रोल्सला देखील तोंड द्यावे लागते. परंतु अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे यात दुमत नाही. ईशाने अलिकडेच मोठा पल्ला गाठला आहे.

इन्स्टाग्रामवर सक्रीय असणाऱया अभिनेत्रीचे 7 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. यामुळे आनंदी झालेल्या ईशाने स्वतःचे एक सिझलिंग छयाचित्र शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. ईशा गुप्ता स्वतःचे प्रोफेशन आणि पर्सनल लाइफबद्दल चाहत्यांना वेळोवेळी माहिती देत असते. अभिनेत्री सध्या मॅन्युअल कॅम्पॉस ग्वाल्लारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. प्रियकरासोबतची छायाचित्रे ती वारंवार शेअर करत असते.

ईशा गुप्ताने अनेक बॉलिवूडपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने आता वेबसीरिजमध्येही काम करण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटांमधील बोल्ड भूमिकांसाठी ती ओळखली जाते. लवकरच ती काही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Stories

ही आहे शाल्वची प्रॉपर्टी

Patil_p

सूर्यवंशीच्या पहिल्या गाण्याचा टीजर सादर

Patil_p

फुलाला सुगंध मातीचामध्ये लगीनघाई

Patil_p

संतोष जुवेकरने चाहत्यांना विचारला खासगी प्रश्न

Patil_p

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने गाठला 300 भागांचा टप्पा

Patil_p

… म्हणून रविनाला ऐकावे लागले टोमणे

Patil_p
error: Content is protected !!