Tarun Bharat

ई-कचऱयाचे व्यवस्थापन प्रत्येकाची जबाबदारी

प्रतिनिधी / बेळगाव

जुने टाकायचे व नवीन विकत घ्यायचे या चंगळवादी प्रवृत्तीमुळे ई-कचरा (सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तु, उपकरणे) वाढत आहेत. त्यामुळे खरेदी करताना ज्या वस्तुंचे पुनर्निर्माण (रिसायकलिंग) करणे शक्मय आहे, त्याच वस्तु खरेदी करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अन्यथा ई-कचऱयाचा भस्मासूर नियंत्रणाबाहेर जाईल आणि पुढील पिढय़ांना संरक्षणासाठी मास्क आणि पीपीई कीट घालून फिरावे लागेल, अशी माहिती अमूल्य बूंद संस्थेच्या संचालिका डॉ. आरती भंडारे यांनी दिली.

मंथन यू टय़ूब चॅनेलवरून मंगळवारी सायंकाळी ‘उत्तरदायित्व ः ई-कचरा व्यवस्थापनाचे’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले.

त्या म्हणाल्या, आपली स्वार्थी आणि बेफिकीर वृत्ती कचरा निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. आपल्याला जुना फोन दाखविण्याची लाज वाटते, परंतु कचरा रस्त्यावर फेकण्याची लाज वाटत नाही. आपण परदेशातून 60 ते 80 टक्के ई-कचरा विकत घेतो. आपल्याला सतत स्वस्त वस्तू घेण्याची सवय आहे. परंतु वस्तुची किंमत कमी झाली की दर्जा खालावतो.

भंगार घेणारे ई-कचरासुद्धा विकत घेतात, परंतु त्याचे वर्गीकरण व विघटन त्यांना जमत नाही. हे लोक त्यातील सोने, तांबे, चांदी हे धातू काढून बाकीचा कचरा सामान्य कचऱयात डंप करतात. यातील रासायनिक धातूमुळे या लोकांचे आरोग्य धोक्मयात येते, याची त्यांना कल्पना नसते. मोठय़ा कंपन्यांकडे ई-कचऱयाची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा आहे, संरक्षक साधणे आहेत, परंतु हे दोन घटक कधीच एकत्र येत नाहीत ही अडचण आहे, असे त्यांनी नमूद केले.

कोणत्याही कचऱयाचा थेट संबंध पाण्याशी येतो. कारण पाण्याशिवाय कोणत्याच वस्तुचे पुनर्निर्माण होऊच शकत नाही. ई-कचरा नुसता फेकला तर तेथे मिथेन वायू साठून आरोग्य धोक्मयात येते. बऱयाच ठिकाणी ई-कचऱयातील धातू काढून तो पाण्यात फेकला जातो आणि पाणी प्रदूषित होते. हेच विषयुक्त पाणी शेतीला वापरले जाते आणि त्यातूनच निर्माण झालेले अन्नधान्य आपण खातो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, असे त्या म्हणाल्या.

पर्यावरण गुणवत्ता श्रेणीत भारताचा क्रमांक 177 वा आहे, ही भुषणावह बाब नक्कीच नाही. इलेक्ट्रॉनिक उपकरणांशिवाय आपण जगूच शकत नाही. परंतु विघटन, पुनर्वापर व पुनर्निर्माण (रिडय़ूस, रियूज व रिसायकल) होऊ शकेल अशाच वस्तुंची आपण खरेदी करायला पाहिजे. ज्या कंपन्या आपल्याकडील त्यांचे उत्पादन पुन्हा घेऊ शकतील त्यांच्याकडे खरेदी करायला हवी. अन्यथा, आपल्या पुढील पिढय़ा ई-कचऱयाच्या भस्मासुराने वेढल्या जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक मंथनच्या अध्यक्षा शोभा लोकूर यांनी केले. सुरेखा भावी यांनी परिचय करून दिला. ऐश्वर्या मुतालिक-देसाई यांनी आभार मानले. संकेत कुलकर्णी यांचे तंत्रसाहाय्य लाभले. 

Related Stories

शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

जलवाहिन्या घातलेल्या रस्त्यांची दुरुस्ती

Amit Kulkarni

किरण ठाकुर-सहकार क्षेत्रातील राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्त्व

Amit Kulkarni

सोने चोरी प्रकरणातील दलालाने पैसे का परत केले?

Amit Kulkarni

गौरीचे आज होणार आगमन

Patil_p

शुक्रवारी शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

Amit Kulkarni