Tarun Bharat

ई-कॉमर्स बाजाराला उज्ज्वल भविष्य

बाजारपेठेची उलाढाल 188 अब्ज डॉलर्सवर पोहचणार- ऑनलाइन खरेदीत वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील ई-कॉमर्स कंपन्यांना येणाऱया काळात चांगले दिवस अनुभवायला मिळणार आहेत. ग्राहकांचे डिजिटल पद्धतीने ऑनलाइन वस्तु घेण्याचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण पाहता 2025 पर्यंत ई-कॉमर्सची भारतातील बाजारपेठ 188 अब्ज डॉलर्सची होण्याचा अंदाज बांधला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन ई-कॉमर्सच्या कंपन्यांचा व्यवसाय चांगला झाल्याचे सांगितले जात आहे. 

मागच्या वर्षी ई-कॉमर्स उद्योगाची उलाढाल ही 64 अब्ज डॉलर्सची झाली होती. उद्योग मंडळ फिक्की (एफआयसीसीआय) यांच्या ताज्या अहवालात यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. देवाण-घेवाणीच्या व्यवहारातील हे एक विश्वासार्ह पाऊल ठरण्यासाठी ई-कॉमर्सची बाजारपेठ सज्ज होणार आहे. यापूर्वी पर्यायी स्वरूपात खरेदीसाठी ई-कॉमर्सचा विचार ग्राहक करताना दिसत होते. पण आता मुख्यत्वेकरून ऑनलाइन खरेदीवर ग्राहकांचा भर दिसतो आहे. गेल्या एक दोन वर्षात ऑनलाइन खरेदीला भारतात वाढता प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच येणाऱया काळात ई-कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत. या बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी वाढताना दिसणार असून कंपन्यांची स्पर्धा अधिक तीव्र होताना दिसणार आहे.

विश्वास, पारदर्शकता महत्त्वाची ठरतेय

कोरोना महामारीच्या दरम्यान लोकांना बाहेर पडता आलं नाही आणि मनाजोगते बाहेर जाऊन खरेदीही करता आली नाही. त्यामुळे अनेकांनी ऑनलाइन खरेदीवर भर दिल्याचे दिसून आले आहे. विश्वास आणि पारदर्शकता या बळावर कंपन्यांनी गेल्या काळात आपली सेवा उत्तमपणे दिली असल्याने याकडे अनेकांचे आकर्षण वाढले आहे. संकटाच्या काळात विविध कंपन्या आणि ब्रँडस्नी ग्राहकांच्या गरजा पुरवल्या आहेत.

Related Stories

बाजार सलग दुसऱया दिवशी घसरणीत

Amit Kulkarni

बजाज ऑटो गुंतवणार300 कोटी रुपये

Patil_p

‘ऍपल’वाढविणार आयफोन-आयपॅडचे उत्पादन

Patil_p

दमदार नफ्यामुळे टायटनचे समभाग चमकले

Patil_p

विदेशी गुंतवणूकदारांची भारताला पसंती

Patil_p

हिरो इलेक्ट्रिकची ऑनलाईन बुकिंग सुविधा

Patil_p
error: Content is protected !!