Tarun Bharat

ई-चलान प्रणालीची तब्बल 10 कोटी 91 लाखांची दंडात्मक रक्कम थकित

वाहतूक नियमांचा भंग: अडीच वर्षांपासून दंडच भरलेला नाही; दंडवसुलीसाठी जिह्यात विशेष मोहीम ; शहरात तीन कोटी 95 लाखांचा दंड थकित

प्रतिनिधी / कोल्हापूर

वाहतूक नियमभंग केलेल्या वाहनांवर मोटर वाहन कायद्याप्रमाणे ई-चलान प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई झाली. मात्र कारवाई केलेल्या वाहनधारकांनी दंडच भरलेला नाही. गेल्या अडीच वर्षांत जिह्यात सुमारे 10 कोटी 91 लाख 71 हजार 500 रुपयांचा दंड न भरल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली. हा थकित दंड भरून घेण्याबाबत जिह्यात विशेष मोहीम सुरू केली आहे.

जिह्यात मे, 2019 पासून ई-चलानद्वारे दंड आकारण्यात आला आहे. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यापासून गेल्या अडीच वर्षांत अनपेड केसेसची संख्या वाढत आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, शहर वाहतूक शाखा यांच्यावतीने थकित दंड भरून घेण्याबाबत विशेष मोहीम सुरू केली आहे. दंड भरून घेतल्यानंतर तत्काळ त्याची पावती दिली जाते. गेल्या अडीच वर्षांत जिह्यात 2 लाख 86 हजार 616 वाहनधारकांनी 5 कोटी 52 लाख एक हजार रुपये दंड भरला. तर सुमारे 4 लाख 5 हजार 651 वाहनधारकांचा 10 कोटी 91 लाख 71 हजार 500 रुपये दंड थकीत आहे.

शहरात 1 लाख 54 हजार 876 वाहनधारकांनी 3 कोटी 33 लाख 26 हजार 650 रुपये दंड भरला, तर 1 लाख 76 हजार 607 वाहनधारकांनी 3 कोटी 95 लाख 87 हजार रुपये दंड थकविला आहे.

          वाहनधारकांनी येथे भरावा दंड...

कोल्हापूर शहर वाहतूक शाखा, दसरा चौक. प्रत्येक सिग्नल चौकातील ई-चलान मशीन असलेल्या वाहतूक पोलिसाकडे शासनाच्या www.mahatrafficechallan.gov.in या वेबसाइटवर आपल्या वाहनांचा किंवा चलान क्रमांक नोंदविल्यास प्रलंबित तडजोड शुल्क दिसून येईल. तेथे चलान क्रमांकाची निवड करून दंडाची रक्कम मोबाइल पेमेंट करता येते.

Related Stories

कोल्हापूर : १५ व्या वित्त निधी वाटपाबाबत दुसरी याचिका दाखल

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे २८ मृत्यू ६८७ जण कोरोनामुक्त

Archana Banage

कोल्हापूरच्या संकल्प सभेतून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

Archana Banage

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पलटी, चालक जखमी

Archana Banage

मराठा उद्योजकांना कर्ज देण्यास KDCC बँकेने दुजाभाव करू नये- नरेंद्र पाटील

Archana Banage

कोल्हापूर : अज्ञाताकडून 35 हजाराचा दारूसाठा लंपास

Archana Banage
error: Content is protected !!