Tarun Bharat

ई-रुपीची मर्यादा वाढविली

Advertisements

आता एक लाख रुपयापर्यंत करता येणार व्यवहार

मुंबई

भारतीय रिझर्व्ह बँकेने ई-रुपी (e-RUPI) ची मर्यादा आता एक लाख रुपये केली आहे. आतापर्यंत ही मर्यादा 10 हजार रुपये होती. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्वीमासिक पतधोरण बैठकीनंतर डिजिटल व्यवहारातील काही  निर्णयांना मंजुरी दिली आहे. त्यामधील हा एक निर्णय असल्याची माहिती आहे.

ई-रुपीसाठी लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक नाही. यामध्ये याचा वापर हा एकपेक्षा अधिकवेळा करता येऊ शकतो. ई-रुपीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट 2021 रोजी सादर केले होते. ही एक इलेक्ट्रॉनिक व्हाउचवर आधारीत डिजिटल पेमेन्ट सिस्टम आहे. याच्या आधारे ग्राहकांना एसएमएस किंवा एका क्यूआर कोडच्या मदतीने या सेवेचा लाभ घेता येईल.

डिजिटल पेमेन्टला चालना देण्याचा उद्देश

सदरच्या योजनेचा सरकारचा उद्देश हा डिजिटल पेमेन्टला चालना देणे हा आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेन्ट करता येणार असून यामाध्यमातून सरकारच्या योजनांचा मिळणारा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यास मदत मिळवून देण्याचे सरकारचे ध्येय आहे. ई-रुपी एक प्रीपेड ई-व्हाउचर आहे, जे नॅशनल पेमेन्ट कॉर्पेरेशन ऑफ इंडिया म्हणजे एनपीसीआय यांनी विकसित केले आहे. 

हे होणार फायदे...

­
हे एक कॅशलेस व कॉन्टॅक्टलेस माध्यम

­
ही सेवा देणाऱया आणि घेणाऱयांना थेट जोडते

­
सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थींना मिळणार

­
वन टाईम पेमेन्ट सर्व्हिसमध्ये मिळणार विविध सेवा

Related Stories

मथुरा- वृंदावनमधील हॉटेलमध्ये चिनी नागरिकांना राहण्यास बंदी

Rohan_P

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा राजीनामा

Patil_p

ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पूर्ण

Patil_p

कोरोनावरील दोन नवीन लसी आणि एका गोळीला मंजूरी

Abhijeet Shinde

बंगालच्या किनारपट्टीवर धडकले ‘अम्फान’ चक्री वादळ

Omkar B

मेरठमध्ये ऑक्सिजनअभावी 9 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!