Tarun Bharat

उंदरगाव बलात्कार प्रकरणी मनोहर भोसले यास सात दिवसांची पोलिस कोठडी

प्रतिनिधी / करमाळा 

करमाळा तालुक्यातील उंदरगाव आश्रमातील  बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर भोसले यास पोलीसांनी काल (ता.19) बारामती न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले. त्यानंतर करमाळा येथे आणून त्याची उपजिल्हा रूग्णालयातून तपासणी करून अटक केली. अटकेनंतर आज (ता.20) दुपारी एक वाजता करमाळा न्यायालयातील न्यायाधीश आर.ए. शिवरात्री यांचेसमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने भोसले यास सात दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

भोंदू मनोहर भोसले याच्याविरूध्द ८ सप्टेंबरला रात्री नऊ वाजता सोलापूर येथे पिडीत महिलेवर अत्याचार केल्याबाबतचा शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ९ सप्टेंबरला पहाटे चार वाजता करमाळा पोलीस कार्यालयात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान ९ सप्टेंबरलाच जादुटोणा व फसवणुक प्रकरणी बारामती पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर भोसले पळून गेला होता. दुसर्या दिवशी १० सप्टेंबरला पुणे पोलीसांनी सालपे, ता.लोणंद, जि.सातारा येथील एका फार्म हाऊसवरून भोसले यास अटक केली. त्यानंतर बारामती पोलीसांनी भोसले यास न्यायालयात हजर केले असता सुरूवातीला पाच दिवस तर दुसऱ्यांदा तीन दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर काल (ता.१९) भोसले यास बारामती न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुर केल्यानंतर करमाळा येथील गुन्ह्यातील तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी मनोहर भोसले याची तपासणी कामी मागणी केली. ती मागणी बारामती न्यायालयाने मंजूर केल्यावर भोसले यास करमाळा येथे आणले व अटक करून आज न्यायालयात हजर केले.

आज दुपारी एक वाजता मनोहर भोसले यास न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायाधिशांनी भोसलेला पोलीसांच्या विरूध्द काही तक्रार आहे का ? असे विचारले असता, भोसले यांनी तक्रार नाही असे  सांगितले. त्यानंतर तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी मनोहर भोसले याने दैवी चमत्काराच्या नावाखाली पिडीत महिलेची फसवणूक करून तिच्या इच्छेविरूध्द तिच्यावर बलात्कार केला आहे. त्या अनुषंगाने काही चिठ्या तसेच काही कपडे ताब्यात घ्यावयाचे आहेत. या फिर्यादीतील आणखी दोन आरोपी म्हणजे नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे व वैभव वाघ हे दोघे फरार आहेत. त्यांना अटक करायची आहे. यासह अन्य १७ कारणे पोलीसांनी पोलीस कोठडी मागणीसाठी दिलेली होती व १० दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासकीय अभियोक्ता ॲड.सचिन लुणावत यांनीही आरोपीस तपासाकामी दहा दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली होती.

त्यानंतर भोसलेच्या बाजुने ॲड.रोहित गायकवाड व ॲड.हेमंत नरूटे या दोघांनी युक्तीवाद केला. त्यात त्यांनी आरोपी विरूध्द दाखल झालेली फिर्याद ही संदिग्ध आहे, बनावट असून पैशाचा संदर्भ जोडलेल्या ठिकाणी कोणत्याही बँकेचा संदर्भ अथवा अधिकृत कागदपत्रे नाहीत. तसेच ही महिला सातारा जिल्ह्यातून पाच वेळा भोसले यांच्या मठात येत होती. जर तिच्यावर अत्याचार होत होते तर ती पुन्हा पुन्हा कशी आली. उंदरगाववरून जाताना बारामती पोलीस स्थानक लागते मग तिने घटना घडल्या घडल्या फिर्याद का दिली नाही. याचाच अर्थ केवळ आरोपीला बदनाम करण्यासाठी खोटी फिर्याद दिलेली असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देऊ नये; अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायाधीश शिवरात्री यांनी यातील आरोपीस सात पोलीस कोठडी दिली आहे. 

Related Stories

…तर राज्यात भाजपची सत्ता आली असती : नारायण राणे

prashant_c

संभाजीराजेंबद्दल शिवसेना-काँग्रेसला विचारावे लागेल- शरद पवार

Rahul Gadkar

दत्त गल्ली वडगाव येथे अज्ञाताचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Tousif Mujawar

…मला फेटा नको, नोटा द्या : पालकमंत्री वळसे-पाटील

Archana Banage

सातारा : जमिनीच्या वादातून निसराळे येथे सख्ख्या भावांवर चाकूहल्ला

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये 104 नवे कोरोना रुग्ण

Archana Banage