Tarun Bharat

उंदरवाडी येथे दुर्मिळ गव्हाणी घुबडाला पक्षीमित्रांनी दिले जीवदान

Advertisements

सरवडे / प्रतिनिधी

उंदरवाडी (ता.कागल) येथील पक्षी व सर्पमित्र बाजीराव कुदळे आणि शशिकांत चव्हाण यांनी दुर्मिळ असलेल्या गव्हाणी घुबडाला पकडून जीवदान दिले नंतर त्याला उंदरवाडीच्या जंगलामध्ये सोडून दिले. याबाबत माहिती अशी उंदरवाडी येथील एका घरात दोन दिवस सापासारखा आवाज येत होता. भितीपोटी त्यांनी सर्पमित्र बाजीराव कुदळे व शशिकांत चव्हाण यांना याबाबतीत माहिती दिली. त्यांनी पाहणी केली असता तेथे त्यांना अडगळीत गव्हाणी घुबड असल्याचे दिसले. घुबडाला पकडून त्यांनी दोन दिवस आपल्या घरात ठेवून मांसाहर खायला देवून सशक्त केले व त्याला दुर जंगलामध्ये सोडून दिले. वेगवेगळे आवाज काढून मान फिरवणे हे त्याचे खास वैशिष्ट्य होय. या पक्षाच्या चेहऱ्याचा आकार हृदयासारखा असून सोनेरी आणि राखाडी रंग असून गडद तपकिरी रंगाचे ठिपके आहेत.

Related Stories

ठाकरे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही…

datta jadhav

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 151 पोलिसांना कोरोना; 5 मृत्यू

Rohan_P

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीला मनाई

Abhijeet Shinde

दोघा दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या दोन किंमती दुचाकी जप्त

Abhijeet Shinde

आंदोलने करून कंटाळलेल्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा इशारा

Sumit Tambekar

मोहित कंबोजने आर्यन खानला खंडणीसाठी किडनँप केलं; नवाब मालिकांचा आरोप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!