Tarun Bharat

उंदरासाठी लावलेल्या सापळय़ात अडकले घुबड

बेळगाव  / प्रतिनिधी

गुड्सशेड रोड येथील डेक्कन हॉस्पिटलनजीक एका इमारतीत उंदरासाठी लावलेल्या सापळय़ात घुबड अडकले. ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी सर्पमित्र राजू फडतरे यांना याची माहिती दिली. त्यांनी त्या घुबडाची सुटका करून त्याला जीवदान दिले.

उंदरांचा उपद्रव वाढल्याने सापळा लावण्यात आला होता. या सापळय़ात 2 उंदीर अडकले होते. या उंदरांसाठी आलेले घुबडच या सापळय़ात अडकले. त्याची सुटका करणे काहीसे कठीण असल्याने सर्पमित्राला बोलाविण्याचे ठरविण्यात आले. राजू फडतरे यांनी येऊन त्या घुबडाची सुटका केली. तसेच त्याची स्वच्छता करून त्याला सुखरूपपणे सोडण्यात आले.

Related Stories

हा जीवघेणा प्रवास कशासाठी?

Patil_p

बेळगाव- बेंगळूर रेल्वेला केवळ 29 टक्केच प्रवासी

Patil_p

क्रीडाक्षेत्रात महिलांनी अग्रेसर राहणे अभिनंदनिय बाब

Amit Kulkarni

रेल्वेस्थानकावर कडक बंदोबस्त

Amit Kulkarni

शाहूनगर येथील योगवर्गाचा वर्धापन दिन

Amit Kulkarni

कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील ढोल ताशा पथकाने परिसर दणाणला

Rohit Salunke