Tarun Bharat

उंब्रज सेवा रोडलगत शॉर्टसर्कीटने एक दुकान जळून खाक


Advertisements

येथील सेवा रोड लगत असणाऱ्या सैनिक बँके समोरील एका दुकानास अचानक शॉर्टसर्कीटने आग लागल्याने फूटवेअर दुकान जळून आगीत खाक झाले तर अन्य चार दुकानांना आगीची झळ बसली.
यामध्ये महाराष्ट्र फूटवेअर हे दुकान जळून खाक झाले आहे तर अन्य जनेरिक मेडिकल, वडापाव व चहा सेंटर आणि अन्य एक बेकरी यांना आगीची मोठ्या प्रमाणात झळ बसली आहे.या आगीत लाखो रुपयांची हाणी झाली आहे. सदरची घटना रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,आशियाई महामार्गालगत सेवा रोडलगत असणाऱ्या सैनिक बँकेच्या समोरील मोकळ्या जागेत असणाऱ्या दुकान गाळ्यापैकी एका बंद असलेल्या फूटवेअर दूकानाला शॉर्टसर्कीटने अचानक आग लागली सदरची आग स्थानिक युवकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सदरची माहिती उंब्रज पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सेवा रोडवरील वाहतूक बंद करून आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पाण्याचे टँकर मागविले.तत्पूर्वी आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील चार दुकानांना या आगीची मोठ्या प्रमाणात झळ पोहचल्याने लाखो रुपयांची हाणी झाली. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात नागरिक व युवकांना यश आले. सुदैवाने दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनास्थळी नागरिक व युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Related Stories

मौजे कारंडवाडी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र; आदेश जारी

Archana Banage

सोने खरेदीला मिळाला थंड प्रतिसाद

Patil_p

ऊस तोडणीसाठी यंदा पैसे मागितल्यास तक्रार करा : साखर आयुक्त

Archana Banage

दृष्टीहिन महिला 40 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण

Patil_p

खटाव तालुक्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू

Patil_p

नजरा जावली, खटाव, कराड, पाटणच्या निकालाकडे

datta jadhav
error: Content is protected !!