कुंभोज / वार्ताहर
कुंभोज ता. हातकणंगले येथे हजारो वर्षांची परंपरा असणार्या जैन धर्मीयांच्या उगार पद्मावती देवीचे मानाच्या सोन्याच्या मूर्तीचे उद्या कुंभोज येथे ओटी भरण्यासाठी आगमन होणार आहे. भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे कुंभोज गावचे मानाच्या पाटील घराण्याच्यावतीने देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे जैन बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून देवीच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
परिणामी हजारो वर्षांपूर्वी पद्मावती देवी कुंभोज येतून दसऱ्या दिवशी आपल्या लाडक्या कुंभोज गावचे पाटील कन्या उगार स्थित असणाऱ्या आपल्या लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी उगार येथे गेल्या होत्या. परिणामी सदर कन्येने आपल्या घरातच आपल्या नजरेसमोर सदर पद्मावती देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तेथे मोठे मंदिर बांधले. सदर पद्मावती देवीच्या मूर्तीवर असणारे कुंभोज गावच्या पाटील कन्या चे लहानपणापासून असणारे प्रेम देवी वरती असणारा विश्वास यामुळे सदर मुलीच्या लग्नानंतर देवीला ही तिच्यासाठी उगार गावी जावे लागले. परिणामी कुंभोज गावातून सदर मूर्ती उगार गावी नेत असताना कृष्णा नदीला आलेला प्रचंड महापूर पाहून नदीवरून पलिकडे कसा जायचा हा प्रश्न पंडिताना निर्माण झाला होता परिणामी सदर देवीच्या मूर्तीचे पाय नदीला लागतात नदी दुभांंगली गेली व नदीने देवीला रस्ता करून दिला अशी आख्यायिका सांगितली जाते.
इतिहासात पहिल्यांदाच ओटी भरण्यासाठी पद्मावती देवीचे आगमन कुंभोज येथे होणार आहे. यामुळे कुंभोज ग्रामस्थांचात उत्साहाचे वातावरण पसरले असून सर्व जैन श्रावक, श्राविका यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुंभोज जैन श्रावक यांनी केले आहे.

