Tarun Bharat

उग्रवादी संघटनांकडून आसाममध्ये जाळपोळ

सात ट्रकसह पाच चालकांनाही जाळले

गुवाहाटी / वृत्तसंस्था

आसाममधील दिमा हसाओ जिह्यात उग्रवाद्यांनी मोठय़ा प्रमाणात वाहनांची जाळपोळ केली आहे. उमरंगसो लंका रोडवरील सात वाहनांना आग लावण्यात आली असून पाच ट्रकचालकांचाही जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुवाहाटीपासून 200 किलोमीटर अंतरावर असणाऱया दिमा हसाओ येथे ही घटना घडली आहे. आग लावण्यात आलेले ट्रक सिमेंट तयार करणाऱया प्लान्टसाठी कोळसा आणि अन्य सामानाची वाहतूक करत होते.

जाळपोळीच्या घटनेपूर्वी उग्रवाद्यांनी ट्रकच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर काही वेळातच वाहनांना आग लावून उग्रवादी फरार झाले. स्थानिकांनी याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पाच मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळले आहेत. डिमासा नेशनल लिबरेशन आर्मीच्या (डीएनएलए) उग्रवादी समूहाने हा हल्ला केला असण्याची शक्मयता आसाम पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली असून उग्रवाद्यांना पकडण्यासाठी आसाम रायफल्स पथकाचीही मदत घेतली जात असल्याचे पोलीस अधिकारी जयंत सिंह यांनी सांगितले.

Related Stories

योगी सरकारचे ‘बजेट’ 6.15 लाख कोटींचे

Amit Kulkarni

माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन

Omkar B

मान्सून 15 मे पर्यंत अंदमानात

datta jadhav

देशभर शेतकरी उतरले रस्त्यावर

Patil_p

कोरोना तरीही कॉर्पोरेटपेक्षा प्राप्तिकराचे अधिक संकलन

Amit Kulkarni

तालिबान्यांसह समर्थकांच्याही फेसबुक अकाऊंटवर बंदी

datta jadhav