Tarun Bharat

उघडय़ावर कचरा फेकणाऱयांविरूध्द मुरगाव पालिकेची दंडात्मक कारवाई

Advertisements

प्रतिनिधी /वास्को

पालिका क्षेत्रात उघडय़ावर कचरा टाकून गलिच्छता पसरविण्यात येत असल्याने मुरगाव पालिकेने कडक कारवाई हाती घेतली आहे. उघडय़ावर कचरा टाकणाऱयांना आता दंड देण्यात येणार आहे. अशा कारवाईचा आदेश मुरगांव पालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी व मुरगांवचे नगराध्यक्ष दामोदर कासकर पालिका कर्मचाऱयांना दिला आहे. या आदेशानुसार राजेश सावंत, एकनाथ पडवळ, फकिराप्पा हरिजन, सागर सातार्डेकर, संजय मेस्त्री, कुमार शेरवे, श्याम हरिजन व श्रीकांत चलवादी यांनी या कारवाईची सुरवातही केली आहे.

मुरगांव पालिका क्षेत्रात उघडय़ावर कचरा टाकण्याचे प्रकार नित्याचेच झालेले आहे. पालिका क्षेत्रातील अनेक प्रभागात रस्त्याच्या बाजुला कचरा पसरलेला दृष्टीस पडतो. याची दखल पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी घेतली आहे. काल शुक्रवारपासून पालिका निरीक्षकांनी काही प्रभागात भेट देऊन पाहणी केली व उघडय़ावर कचरा टाकणाऱयांना दंड ठोठावला. सुरवातीला 200 रूपये दंड आकारण्यात येत होता. उघडय़ावर कचरा टाकणाऱया प्रकाराविरूद्ध हा दंड आता 500 ते 1000 रूपयापर्यंत वाढवण्यात येणार आहे. पालिका क्षेत्रातील पंचवीसही प्रभागात ही मोहिम सुरू ठेवण्यात येणार आहे.

error: Content is protected !!