Tarun Bharat

सीनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत उचगावच्या अनिता पाटीलांना चार सुवर्ण

Advertisements

प्रतिनिधी / उचगाव 

केरळ येथील कोचीकोडी येथे झालेल्या 40 व्या नॅशनल सीनियर ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये उचगावच्या अनिता जयवंत पाटील यांनी पाच किलो मीटर धावणे, पाच किलोमीटर चालणे, पंधराशे मीटर धावणे, दहा किलोमीटर धावणे या चार प्रकारात चार सुवर्णपदकांची कमाई करत केरळमध्ये करवीर तालुक्यातील उचगाव गावचा झेंडा फडकवला. पाटील यांचे उचगावात आगमन होताच कमानीपासून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

४७ वर्षीय अनिता पाटील यांना पहिल्यापासूनच मर्दानी खेळाची आवड आहे. त्यांचे पती जयवंत पाटील यांनी घराच्या तिसऱ्या मजल्यावर बजरंग आखाडा या नावाने कुस्तीचे मैदान तयार केले आहे. तेथे ते मोफत कुस्तीचे प्रशिक्षण देतात तसेच त्यांनी आपली पत्नी अनिता पाटील यांना कुस्ती कलेबरोबरच विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी आतापर्यंत विविध अथलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेऊन विजेतेपद पटकावले आहे. तसेच त्यांनी 1111सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रमही केला आहे. तसेच एका तासात 435 सपाट्या (बैठका व जोर एकाचवेळी) मारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तर आता केरळ येथे झालेल्या स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई केली.

उचगाव मध्ये आगमन होताच त्यांची पारंपरिक वाद्याच्या गजरात जीपमधून जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी सरपंच अनिल शिंदे, नामदेव वाईंगडे, विनोद थोरात, सचिन राठोड, संग्राम यादव, मारुती यादव, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र चौगुले. निवास यमगर, श्रीकांत पाटील, दत्तात्रय चव्हाण, दादासो यादव, सुभाष पाडेकर, मंगेश मोगणे, अनिल कदम, आनंद धातूंडे, संतोष शेंडे, प्रकाश पाटील यांच्यासह बजरंग आखाड्यातील पैलवान व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिता जयवंत पाटील यांनी मानले आभार
राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी करण्याची माझी इच्छा होती ती पूर्ण झाली. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या स्पर्धेसाठी अभिजीत मस्कर बाळासाहेब भोगम, पीटी पाटील व ग्रामस्थ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अनिता जयवंत पाटील

Related Stories

महात्मा गांधी घराघरात पोहचतील, पण उपयोग होणार नाही : चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

जयसिंगपुरात सॅनिटायझर चेंबरची उभारणी

Abhijeet Shinde

खाते नंबरच्या घोळाचा शेतकऱयांना फटका

Abhijeet Shinde

भागिरथी होम मिनिस्टर स्पर्धेत प्रणिता फराकटे प्रथम

Sumit Tambekar

मोदींच्या काळातच मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाढली

Abhijeet Shinde

ग्रामसभांमध्ये जलजीवन मिशन योजनेचा आढावा घ्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!