Tarun Bharat

उचगाव उड्डाणपुलाजवळ ११ हजारांचा गुटखा जप्त

Advertisements

वार्ताहर / उचगांव

करवीर तालुक्यातील उचगाव- गडमुडशिंगी रस्त्यावर उचगाव उड्डाण पुलानजीक जूपिटर दुचाकी ( एम एच 09 एफडी 8101) वरून गुटखा घेऊन जाणाऱ्या समर्थ लक्ष्मण शिवशरण (वय 23) व तानाजी बाळू आठवले (वय 27, दोघेही रा. आराम चौक, राजेंद्रनगर कोल्हापूर) यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्यांच्याकडून ११ हजार १३० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
शिवशरण व आठवले हे दोघे दुचाकीवरून गुटखा घेऊन जात होते. ते उचगाव उड्डाणपुलाजवळ आले असताना गांधीनगर पोलिसांनी त्यांच्याकडून ११ हजार १३० रुपयांचे आरएमडी, कोल्हापुरी, आर्यन व मुसाफिर गुटख्याचे बॉक्स जप्त केले. पोलीस नाईक मुरलीधर लांगी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शिवशरण व आठवलेवर गुन्हा नोंद झाला आहे.

Related Stories

तंत्रज्ञान क्रांतीत स्व. राजीव गांधीचे योगदान मोलाचे

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अल्पवयीन युवतीवरील अत्याचार प्रकरणी एकास तीन वर्षे सक्तमजुरी

Abhijeet Shinde

अभिनेत्री पायल घोषचा रामदास आठवलेंच्या पक्षात प्रवेश

Rohan_P

Kolhapur; मंत्रालयाच्या नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

Abhijeet Khandekar

श्री सेवागिरी रथावर 30 लाख 56 हजार देणगी जमा

Patil_p

पाठय़पुस्तकाचे मंगळवारपासून होणार वितरण

Patil_p
error: Content is protected !!