Tarun Bharat

उचगाव येथे आहार किटचे वितरण

वार्ताहर / उचगाव

देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट प्रभावी ठरली. रुग्ण व मृतसंख्येत वाढ झाली. लॉकडाऊनुमळे गोरगरीब जनतेच्या अन्नपाण्याचा प्रश्न उभा राहिला. यावेळी धर्मस्थळ ग्रामवृद्धी योजना मदतीला धावून आली आणि संपूर्ण बेळगाव जिल्हय़ामध्ये गावागावातून आहार सामग्री किट्सचे वितरण आम्ही करत आहोत, असे मत धर्मस्थळ ग्रामवृद्धी योजनेचे संचालक प्रदीप जी. यांनी व्यक्त केले. शनिवारी धर्मस्थळ योजनेंतर्गत उचगावमधील गोरगरीब जनतेला आहार सामग्री किटचे वितरण करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रा. पं. चे अध्यक्ष जावेद जमादार होते. कार्यक्रमाला ग्रा. पं. उपाध्यक्षा मथुरा तेरसे, माजी अध्यक्षा व आजीव सदस्या योगिता देसाई, सदस्य बाळकृष्ण तेरसे, एल. डी. चौगुले, उमेश बुवा, धर्मस्थळ योजना अधिकारी प्रभाकर, एन. ओ. चौगुले, अशोक चौगुले, मालू लोहार, लता कम्मार, सरस्वती देसाई उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत उचगाव विभाग सुपरवायझर गणपती नाईक यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उचगावमधील गोरगरीब महिलांना आहार सामग्री किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी योगिता देसाई म्हणाल्या, धर्मस्थळ संस्था ही एक दानशूर व कार्यरत संस्था असून या संस्थेच्यावतीने महिलावर्गाला स्वकर्तृत्वावर उभे राहण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाते. यामुळे आज ग्रामीण भागातल्या अनेक महिला स्वावलंबी बनल्या असून छोटे-मोठे उद्योगधंदे त्यांनी सुरू केले आहेत. कार्यक्रमांमध्ये कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत एन. ओ. चौगुले, एल. डी. चौगुले यांनी मार्गदर्शन केले. गणपती नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महिला वर्ग उपस्थित होता..

Related Stories

अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची घाईगडबड

Patil_p

शेतकऱयांचा मजगावात रास्ता रोको

Amit Kulkarni

अंगणवाडी की मसाज सेंटर ?

Amit Kulkarni

पदवीदानासाठी विद्यार्थ्यांकडून 1200 रुपये आकारणी

Patil_p

इंडोनेशियातील दहा तबलीगींना दंड

Patil_p

मतदारांचा वॉर्ड बदलल्याने उमेदवारांना धक्का

Amit Kulkarni