Tarun Bharat

उचगाव येथे बलिदान मासची सांगता

उचगाव : उचगाव येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव शाखा व शिवस्मारक युवक मंडळातर्फे फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासून फाल्गून अमावास्येपर्यंत बलिदान मास पाळण्यात आला. संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती देत धर्मासाठी बलिदान दिले. हे बलिदान प्रत्येक नागरिकांला समजावे यासाठी बलिदान मासचे आयोजन केले होते.

अमावास्येपर्यंत सुरू असलेल्या बलिदान मासची सांगता सोमवार दि. 12 रोजी पार पडली. रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बेळगावहून आणलेली ज्वाला या भागातील सर्व गावांमधून फिरविण्यात आली. सोमवारी गावातील सर्व शिवप्रेमी व धारकरी यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर या बलिदान मासचा सांगता केली. एक महिना रोज सायंकाळी साडेसात वाजता श्लोक वाचन व पूजन नित्यनेमाने होत असे. यामध्ये उचगाव विभागप्रमुख मिथिल जाधव, उचगाव प्रमुख नेहल जाधव तसेच संदीप होनगेकर, मुकुंद नवार, अमर जाधव, अरुण होनगेकर, महेश कुंडलकर, दिनकर वाळके, अमोल जाधव, परशराम जाधव, मारुती वाळके, उदय कदम, गौतम होनगेकर, यश मण्णूरकर यांच्या उपस्थितीत बलिदान मासची सांगता झाली.

Related Stories

मराठा बँकेमुळे अनेक उद्योगांना बळ

Amit Kulkarni

बिम्समधील 16 वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

Amit Kulkarni

हलगा-मच्छे बायपास प्रकरणात शेतकरी ठरले खरे

Patil_p

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन

Amit Kulkarni

दीप अमावास्येनिमित्त बाजारपेठेत गर्दी

Amit Kulkarni

स्पर्धा परीक्षेतील यश जीवनाला उत्तम कलाटणी देते

Patil_p