Tarun Bharat

उचगाव येथे होणार अठरावे साहित्य संमेलन

वार्ताहर /उचगाव :

उचगाव येथील निसर्गरम्य मळेकरणी देवीच्या आमराईत उचगाव मराठी साहित्य अकादमीतर्फे अठरावे उचगाव मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे साहित्य संमेलन चार सत्रांमध्ये होणार असून या संमेलन सोहळय़ासाठी ख्यातनाम साहित्यिक, कवी, विचारवंत यांच्या उपस्थिती होणार आहे.

उचगाव मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून प्रत्येकाच्या तोंडी-मनी एकच ध्यास आणि तो म्हणजे अठरावे साहित्य संमेलन.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, किरण ठाकुर, राजेश पाटीलया मान्यवरांची संमेलनाला हजेरी

या संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसेच गेली अठरा वर्षे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक चेअरमन व दै. तरुण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची उपस्थिती राहणार आहे. तर चंदगड तालुक्मयाचे नवनिर्वाचित आमदार, सीमाबांधवांचे एक आधारस्तंभ राजेश पाटील ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत.

चार सत्रात होणार संमेलन

पहिल्या सत्रामध्ये रविवारी सकाळी 8.30 वाजता उचगाव येथील मध्यवर्ती गांधी चौकातील गणेश-विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातून समारंभपूर्वक ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार आहे. प्रारंभी झुआरी कंपनी गोव्याचे क्हा. प्रेसिडेंट आर. वाय. पाटील यांच्या हस्ते गणेशपूजन होईल. सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई पूजन होईल. डॉ. प्रविण देसाई यांच्या हस्ते श्रीराम पूजन तर डॉ. ज्ञानेश्वर कोवाडकर यांच्या हस्ते पालखी पूजन तर जायंट्स बेळगावचे अध्यक्ष सुनिल भोसले यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. यानंतर ग्रंथदिंडीचा सोहळा मळेकरणी देवीच्या आमराईत पोचल्यानंतर मळेकरणी देवीचे पूजन डॉ. मोहन पावशे यांच्या हस्ते होईल तर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांच्या हस्ते झाल्यानंतर सभामंडपाचे उद्घाटन राजेंद्र बाडीवाले, व्यासपीठाचे उद्घाटन महादेव तरळे, सरस्वती फोटोपूजन डॉ. वामन चोपडे, ज्ञानेश्वर फोटोपूजन डॉ. धाकलू कदम, छत्रपती शिवाजी महाराज फोटोपूजन युवराज मुतगेकर, शहीद राहुल भैरू सुळगेकर फोटोपूजन अडत व्यापारी नागेश झंगरुचे यांच्या हस्ते झाल्यानंतर संमेलनाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे अध्यक्षीय भाषणानंतर पहिले सत्र संपेल.

दुसऱया सत्रामध्ये कवि संमेलनात के. एम. अग्रवाल महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक प्रशांत मोरे यांचे ‘आई एक महाकाव्य’ यावर कवितांचे सादरीकरण होणार आहे. दोन सत्रानंतर उपस्थित सर्व साहित्य रसिकांसाठी मळेकरणीदेवीच्या आमराईमध्ये गोड वनभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

वनभोजनानंतरच्या तिसऱया सत्रात वारकरी महामंडळ, युवा संघटना, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व संगमनेर येथील हभप राजेंद्र महाराज येवले यांचे संत साहित्य यावर विनोदी शैलीमध्ये व्याख्यान होणार आहे.

चौथ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये ‘हसायदान’ या हास्य कार्यक्रमात विनोदी कथाकथन प्रेमलाताई चव्हाण ज्युनियर कॉलेज फलटण-सातारा येथील प्रा. रविंद्र कोकरे यांचे विनोदी कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे.

Related Stories

Karnataka; कर्नाटक कॉंग्रेसकडून ईडीच्या चौकशीचा निषेध

Abhijeet Khandekar

कपिलतीर्थ मंडळाच्या युवकांची गडकोट मोहीम

Patil_p

काजू शेतकऱयांना मदत करणारा ‘माफिया’ होत नाही

Patil_p

सोशल क्लबच्या क्रीडाभवनचे उद्घाटन

Amit Kulkarni

श्रीरामजन्मभूमी शिलान्यास निमित्त खानापूर तालुक्यात आनंदोत्सव

Patil_p

येळ्ळूर विभाग म. ए.समितीतर्फे सत्कार

Patil_p