Tarun Bharat

उचगाव रेणुकादेवी मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रम

वार्ताहर/ उचगाव

उचगाव पंचक्रोशीतील रेणुकादेवी मंदिराच्या उद्घाटन समारंभानिमित्त मंगळवार दि. 17 ते शुक्रवार दि. 20 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष संभाजी कदम यांनी कळविले आहे.

उचगाव ग्रामस्थांच्या बैठकीत एक वर्षापूर्वी रेणुकादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करून मंदिराच्या कामाला प्रारंभ केला होता. सध्या रेणुकादेवीचे मंदिर पूर्ण झाले आहे. गावातील देणगीदार व वर्गणीच्या स्वरुपात निधी जमा करून मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आहे.

मंगळवारी ओटी भरण्याचा कार्यक्रम

गावामध्ये देवदेवतांची लहान-मोठी 22 मंदिरे आहेत. गावातील कोणत्याही धार्मिक समारंभापूर्वी देवदेवतांच्या मंदिरांमध्ये सवाद्य ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. याला अनुसरून मंगळवार दि. 17 रोजी सकाळी 10 वाजता सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवारी कळस-मूर्ती मिरवणूक

मंदिरामध्ये यापूर्वी देवीचा जग होता. मूर्ती नव्हती. मात्र, सौंदत्ती येथील रेणुकादेवी मंदिरामध्ये मूर्ती असून येथील मुख्य पुजारींच्या मतानुसार मंदिरामध्ये रेणुकादेवीची मूर्ती प्रति÷ापना करणे आवश्यक असल्याने दगडामध्ये रेणुकादेवीची मूर्ती कोरीव काम करून साकारण्यात आली आहे. उचगाव येथील कारागीर गुंडू लोहार यांनी मूर्तीचे सुबक असे कोरीव काम केले आहे. मूर्ती तसेच कळस मिरवणूक सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गणपत गल्ली मार्गे निघून रेणुकादेवी मंदिरापर्यंत येणार आहे. यावेळी गावातील सुवासिनी कळशा घेऊन या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

19 रोजी वास्तू-होमहवन

गुरुवार दि. 19 रोजी मंदिराची वास्तूशांती, होमहवन, पूजा पौरोहित्याच्या मार्गदर्शनाखाली तसेच गावातील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

शुक्रवार 20 रोजी कळसारोहण-उद्घाटन

शुक्रवार दि. 20 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण, अभिषेक, पडली व ओटी भरण्याचा कार्यक्रम तसेच या मंदिरासाठी योगदान दिलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार आयोजिला आहे. समारंभाला अलौकिक ध्यान मंदिर मठाचे मठाधीश उपस्थित राहणार आहेत. बुधवार, गुरुवार व शुक्रवारी गावात कडक वार पाळण्यात आले आहेत.

Related Stories

दंड वसुल करणाऱया समाज प्रमुखांवर कारवाई करा

Patil_p

शिवसेनेमध्ये तरुणाईचा प्रवेश

Amit Kulkarni

म. ए. युवा समितीच्यावतीने शाहू महाराजांना अभिवादन

Omkar B

मारहाण प्रकरणी तिघा जणांना अटक

Patil_p

प्रतापसिंह थोरात यांना मुख्यमंत्री पदक

Patil_p

‘त्या’ युवकाकडून आणखी सात मोटार सायकली जप्त

Patil_p