Tarun Bharat

उचगाव शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दुर्गामाता दौडबाबत मार्गदर्शन

वार्ताहर / उचगाव

उचगाव येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने शनिवार दि. 17 पासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर दुर्गामाता दौडला प्रारंभ होणार आहे. यासंदर्भात दौडीबाबत गावातील युवकांची बैठक गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश-विठ्ठल मंदिरामध्ये पार पडली. अध्यक्षस्थानी उचगाव विभागप्रमुख नेहाल जाधव
होते.

यंदा दुर्गामाता दौडवरही कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. बेळगाव तालुक्यातील गावागावांमधून दुर्गामाता दौडबाबत उत्सुकता पहावयास मिळते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाच्या भोवऱयात दुर्गामाता दौड अडकल्याने युवक वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

दुर्गामाता दौडची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी यावर्षी दौडीतील धारकरी, युवकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना करून काळजी घेत दौडचा मार्ग पूर्ण करायचा आहे. यामध्ये सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

नियमांचे पालन करून दौडचे आयोजन

नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस उचगाव परिसरातील गावामधून ही दौड निघणार  आहे. मात्र, यावर्षी दौडीमध्ये भाग घेणाऱया युवकांना कोरोनामुळे बंधने घालण्यात आली आहेत. कोरोनाचे सावट असल्याने सर्वांनी दक्षता घेऊन दुर्गामाता दौड पार पार पाडावी.

Related Stories

शिवसैनिकांकडून मणगुत्तीत शिवमूर्ती भेट

Patil_p

विमानतळावरील टॅक्सी ट्रकचे काम प्रगतिपथावर

Amit Kulkarni

उसाला तुरे फुटल्याने उत्पादनात घट

Patil_p

बेळगाव-धारवाड रेल्वेचा शुभारंभ

Amit Kulkarni

गुऱ्हाळ घर प्रकल्पास नियमांची आडकाठी

Omkar B

बेळगावच्या सायकलस्वारांना सुपर रँडोन्यूएर किताब

Amit Kulkarni