उचगाव : उचगाव मार्कंडेय नदीच्या दुतर्फा असलेल्या हजारो एकर शेतवडीतील कलंडलेले विद्युत खांब आणि लोंबकळणाऱया वीजवाहिन्यांमुळे ये-जा करणाऱया शेतकरी, ट्रक्टर, टेम्पोंना धोका निर्माण झाला आहे. हेस्कॉमने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे. सध्या शेतीची कामे जोरात सुरू असून शेतकऱयांना वारंवार शेतवडीत ये-जा करावी लागते. याबरोबरच ट्रक्टर, टेंपो व बैलजोडय़ा घेऊन शेतात जावे लागते. मात्र शेतातून गेलेल्या या वीजवाहिन्यांना स्पर्श होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात अनेकवेळा हेस्कॉमकडे तक्रार देऊन देखील अद्याप याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. मार्कंडेय नदीच्या परिसरात दरवषी येणाऱया महापुरात या विद्युतखांबांना पाण्याचा मारा होत असतो. त्यामुळे ते कलंडले आहेत. तर लोंबकळणाऱया तारांमुळे ट्रक्टर व शेतकऱयांना धोका निर्माण झाला आहे. उचगाव विभागीय अधिकाऱयांने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.


previous post
next post