Tarun Bharat

`उजनी’तील पाच टीएमसी सांडपाणी मोजण्याचे आव्हान

सोलापूर जिह्यातील जलनियोजनावर भविष्यात परिणाम

रजनीश जोशी/सोलापूर 

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्मयातील 22 गावांना सिंचनासाठी पुरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र, या योजनेसाठी बिगर सिंचनातून उजनी जलाशयातील सांडपाणी उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. जलाशयात पाच टीएमसी सांडपाणी उपलब्ध होते का, हा कळीचा मुद्दा आहे. दोन वर्षात ही योजना पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्र राज्य जलसंसाधन नियामक प्राधिकरण (एमडब्लूआरआरए) आणि राज्यपालांकडून या योजनेला हिरवा कंदील मिळणेही गरजेचे आहे.

एखादी नवी योजना कार्यान्वित करताना तिच्या व्यवहार्यतेचा मुद्दा महत्त्वाचा असतो. उजनी जलाशयात पाच टीएमसी सांडपाणी जमते का, याची शहानिशा नाशिकच्या ‘जलविज्ञान’कडून करून त्यांचे तसे प्रमाणपत्र घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसे सिद्ध झाल्यास धरणातील जलप्रदूषण इतक्मया मोठÎा प्रमाणावर होत असताना जलसंपदा खाते कृतीशून्य कसे, असा नवा मुद्दा चव्हाटÎावर येण्याची शक्मयता आहे.

63 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली

इंदापूर तालुक्मयात एकूण 143 गावे आहेत. या योजनेमुळे त्यातील 54 गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. या परिसरातील 63 हजार एकर जमिनीला पाणी मिळणार आहे. त्याकरिता सहाशे कोटी रूपयांचा खर्च होणार आहे.

सोलापूरच्या जलनियोजनावर भविष्यात परिणाम

सोलापूर जिह्याच्या जलनियोजनावर या पाच टीएमसी पाणी वाटपाचा भविष्यात दुष्परिणाम होऊ शकतो. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरचे पाणी पळवल्याचे सिद्ध झाल्यास राजकारण संन्यास घेऊ, असे जाहीर केले आहे. मात्र, दुष्काळी वर्षांत उजनी धरणात मृतसाठÎातच पाणी असते. सोलापूर जिह्याचे
प्रकल्प आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडलेले असते. तरीही  जलाशयातून पाणी उचलण्याचा आदेश असल्याने सोलापूर जिह्याला डावलून सरळ सरळ पाच टीएमसी किंवा उपलब्धतेच्या प्रमाणानुसार पाणी घेतले जाणार, यात शंका नाही.

असे नेणार इंदापूरला पाणी

उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात कुंभारगाव आहे. तेथील उजनी जलाशयात दहा हजार हॉर्सपॉवर क्षमतेचा वीज पंप बसवण्यात येईल. तेथून शेटफळगढे येथे मुठा उजवा कालव्यात (खडकवासला) ते सोडण्यात येईल. कुंभारगाव ते शेटफळगढे हे अंतर दहा किलोमीटर आहे. तेथून सणसर कटच्या माध्यमातून नीरा डाव्या कालव्यात ते वळवले जाईल. आणि 22 गावांना सिंचनासाठी ते पुरवण्यात येईल.

Related Stories

फौजदार, सहाय्यक निरीक्षकांसह पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Archana Banage

अखेर कुर्डुवाडी शहर कोरोनामुक्त

Archana Banage

करजगी येथे एका रात्रीत दहा घरे फोडली

Archana Banage

पीक विम्याबाबत विमा कंपनी दोन दिवसात निर्णय घेणार : आ. राणाजगजितसिंह पाटील

Archana Banage

फिरायला गेलेल्या इसमाचा अज्ञात कारणामुळे मृत्यू

Archana Banage

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’

prashant_c