Tarun Bharat

उड्डाणपुलाची निर्मिती शेतकऱयांच्या मुळावर

कोगनोळी परिसरातील शेतकऱयांची व्यथा : महामार्गाला प्रांताधिकारी कर्लिंगन्नावर, प्रकल्प संचालक पोतदार यांची भेट

वार्ताहर /कोगनोळी

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे रुंदीकरण होणार आहे. याशिवाय या मार्गावर उड्डाणपूल तयार करण्यात येणार असून त्यासाठी शेतकऱयांच्या पिकाऊ जमिनी संपादन केल्या जाणार आहेत. त्यातून शासन शेतकऱयांच्या मुळावर घाव घालत आहे. एकीकडे विकासाचे कारण पुढे करत दुसरीकडे शेतकऱयांची गळचेपी करण्याचे काम सरकार करत आहे. या पार्श्वभूमीवर 27 रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रांताधिकारी, भूसंपादन अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी संतप्त शेतकऱयांनी प्रश्नांचा भडिमार करत अधिकाऱयांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

कोगनोळी येथील महामार्गावरील फाटय़ावर उड्डाणपूल होणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱयांची सुपीक जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. त्याचा जबर फटका शेतकऱयांना बसणार आहे. तो वाचविण्यासाठीचे निवेदन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह विविध खात्याच्या अधिकाऱयांना दिले आहे. त्याची दखल घेत प्रांताधिकारी व भूसंपादन अधिकारी रविंद्र कर्लिंगन्नावर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पाहणी अधिकारी कलमेश गुडीमनी यांनी कोगनोळी येथील टोलनाका, कोगनोळी फाटा, दूधगंगा नदी परिसर, पूरग्रस्त कॉलनी लगत असणाऱया गायरान विभागाला भेट देऊन जागेची पाहणी केली. या ठिकाणी होणार असलेल्या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

यावेळी शेतकरी बाळासाहेब हादिकर व संदीप चौगुले यांनी सदर प्रकल्प राबविल्यानंतर होणारे नुकसान उपस्थित अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी प्रांताधिकारी रविंद्र कर्लिंगन्नावर म्हणाले, संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या ठिकाणच्या शेतकऱयांची शेत जमीन जात असल्याने पर्यायी गायरान जमीन दाखविली आहे. सदर गायरान जमिनीची माहिती वरिष्ट अधिकारी यांच्याकडे कळवून रुंदीकरणाविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार, सहाय्यक फौजदार एस. ए. टोलगी, संजय काडगौडर, अमर चंदनशिव, राजू गोरखन्नावर, एस. एम. गाडीवड्डर यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी अनंत पाटील, युवराज माने, महादेव इंगवले, पुंडलिक माळी, उमेश परीट, नागेश पाटील, गब्बर शिरगुप्पे, अरुण पाटील, सचिन चौगुले, विजय सावजी, अजित चौगुले, मुनीर मुल्ला, तानाजी जाधव, संतोष चौगुले, सदाशिव इंगवले, राजू पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, व्यावसायिक व शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

पोलिसांकडून अडवणूक; कामगारांचे आंदोलन

Amit Kulkarni

गौंडवाड खूनप्रकरणी आणखी तीन महिलांना अटक

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथे एकाला कोरोनाची लागण

Tousif Mujawar

इर्टिगा खरेदीवर जिंकले 10 ग्रॅमचे गोल्ड कॉईन

Omkar B

आमच्याकडे सहानुभूतीने पहा!

Amit Kulkarni

बालचमूंना किल्ले साकारण्याचे वेध

Amit Kulkarni