Tarun Bharat

उत्कृष्ट सेवेकरीता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदके’

  • केंद्राकडून पोलीस पदके जाहीर 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5  पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक, 14 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  एकूण 926  पोलीसपदक जाहीर झाली असून 80  पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 215 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 58 पदके मिळाली आहेत.


देशातील 80 पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरीता  राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावेपुढील प्रमाणे : 

  • ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)

1. श्री. मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संचालक, पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, चव्हाण नगर, पशन रोड, पुणे.

2. श्री संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, शहिद भगतसिंग रोड, कुलाबा, मुंबई.

3. श्रीमती सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.


4. श्री विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.


5. श्री गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, (PAW Wing)

  • राज्यातील एकूण 14 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’


1. श्री राजेश ज्ञानोबा  खांडवे, पोलीस उपनिरीक्षक

2. श्री  मनीष  पुडंलिक  गोरले,  नाईक पोलीस कॉन्स्टेबल

3.श्री. गोवर्धन  जनार्दन  वधाई , पोलीस कॉन्स्टेबल

4. श्री. कैलास काशीराम ऊसेंडी , पोलीस कॉन्स्टेबल

5.श्री. कुमारशहा वासुदेव किरंगे, पोलीस कॉन्स्टेबल

6. श्री. शिवलाल रुपसिंग  हिडको, पोलीस कॉन्स्टेबल

7. श्री. सुरेश दुर्गजी कोवासे, हेड कॉन्स्टेबल

8.श्री.रतीराम रुघराम पोरेटी , हेड कॉन्स्टेबल

9.श्री. प्रदीपकुमार रायभाम गेडाम, नाईक्‍ पोलीस कॉन्स्टेबल

10. श्री. राकेश महादेव नारोटे,  कॉन्स्टेबल

11. श्री. राकेश रामसु  हिचामी, नाईक

12.  श्री. वसंत  नानका तडवी, कॉन्स्टेबल

13.  श्री. सुभाष पाडुरंग ऊसेंडी, कॉन्स्टेबल

14. श्री. रमेश वेनकन्ना कोमीरे, कॉन्स्टेबल


तर राज्यातील एकूण 39 पोलिसांना ‘पोलीस पदक’
देऊन सन्मानित केले जाणार आहे. 

Related Stories

टोळी मुकादमाकडून ऊस वाहतूकदाराला 9 लाखांचा गंडा

Patil_p

पुणे, मुंबईकरांनी वाढवली जिल्हय़ाची चिंता

Patil_p

राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा – राजू शेट्टी

Archana Banage

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी : पंतप्रधानांसह अनेक नत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Abhijeet Khandekar

मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी : माजी न्या. इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती

datta jadhav

पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या ओणम सणाच्या शुभेच्छा!

Tousif Mujawar