Tarun Bharat

उत्कृष्ट सेवेकरीता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

  • राज्याला एकूण 74 पोलीस पदक
Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील 1,380 पदक विजेत्या अधिकारी – कर्मचाऱयांची यादी आज जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 4 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरीता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 25 पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेकरिता 45 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवषी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावषी शौर्य पदक श्रेणीमध्ये 630 व सेवा पदक श्रेणींमध्ये 750 पदक जाहीर झाली आहेत. शौर्य पदक श्रेणीत 2 ‘राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमजी), तर 628 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि सेवा पदक श्रेणीत विशेष सेवेसाठी 88 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) आणि 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 74 पदक मिळाली आहेत.

शौर्य पदक श्रेणीत 2 आणि सेवा पदक श्रेणीत 88 अशा देशातील एकूण 90 पोलीस अधिकारी – कर्मचाऱयांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील चार अधिकारी- कर्मचाऱयांचा समावेश असून त्यांची नावे पुढील प्रमाणे. शौर्य पदक श्रेणीत महाराष्ट्राला एक ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

सुनील दत्तात्रय काळे, हेडकॉन्स्टेबल, केंद्रीय राखीव पोलीस दल. (मरणोत्तर) यासोबतच सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्राला एकूण तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळाली असून आशुतोष कारभारी डंबरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि आयुक्त, स्टेट इंटेलिजन्स विभाग (मुंबई), अशोक उत्तम अहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर, ओझर एअरपोर्ट सुरक्षा, (नाशिक ग्रामीण.) विनोदकुमार लल्ताप्रसाद तिवारी, पोलीस उप निरीक्षक, एच.एस.पी. (यवतमाळ.) अशी त्यांची नावे आहेत.

  • सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्रातील एकूण 45 पोलिसांना ‘पोलीस पदक’

मधुकर किसनराव सतपुते, कमांडन्ट, (औरंगाबाद.), शेखर गुलाबराव कुऱहाडे, उप पोलिस आयुक्त (तांत्रिक), पोलिस मोटर वाहतूक विभाग, नागपाडा, (मुंबई.)सुरेंद्र मधुकर देशमुख, सहाय्यक आयुक्त पोलिस, गुन्हे शाखा, (पुणे शहर.) ज्योत्स्ना विलास रसम, पोलिस सहाय्यक आयुक्त, डी.एन. नगर विभाग, नवीन लिंक रोड, अंधेरी (पश्चिम) (मुंबई.), ललित रामकृपाल मिश्रा, सहाय्यक कमांडन्ट, स्टेट इंटेलिजन्स विभाग, एस.बी. मार्ग, कुलाबा, संतोष सीताराम जाधव, पोलीस सब-इन्स्पेक्टर रिझर्व्ह, पोलिस प्रशिक्षण केंद्र, ननवीज दौड, (पुणे.) विजय नारायण भोसले, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, (पुणे शहर.), पॉल राज अँथनी, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, (पुणे शहर.), सुधीर पांडुरंग शिंदे आणि भीमप्पा देवप्पा सागर निरीक्षक, एम/ओ रेल्वे, (पुणे.) यासोबत नागपुर, अमरावती, रायगड, गडचिरोली, बीड, नाशिक आदि शहरातील कर्मचाऱयांचा समावेश आहे.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विशेष अभिनंदन

महाराष्ट्र पोलीस दलाचा आम्हाला अभिमान आहे. पोलीस दलाच्या ब्रिद वाक्मयाला जागून, या अधिकारी, कर्मचाऱयांनी कर्तव्य बजावून महाराष्ट्राच्या गौरवात भर घातली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील या अधिकारी कर्मचाऱयांचे कौतुक केले आहे.

Related Stories

कर्नालमधील शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात

Patil_p

डिलीव्हरीबॉयनी चोरले पावणेदोन लाखांचे मोबाईल

Patil_p

महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहेत, त्यांनी केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा – संजय राऊत

Abhijeet Shinde

अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही : शरद पवार

Rohan_P

..नाहीतर आंदोलन करु; मनसेकडून डिस्ने हॉटस्टार कंपनीला इशारा

Rohan_P

सोलापूर ग्रामीण भागात 171 कोरोना रुग्णांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!