Tarun Bharat

उत्तरप्रदेशमधील ‘त्या’ घटनेचा बेळगावात निषेध

प्रतिनिधी/ बेळगाव

उत्तरप्रदेश येथील हाथरस येथे झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर तीव्र संताप क्यक्त होत आहे. संपूर्ण देशाबरोबरच बेळगाव परिसरातूनही याबाबत संताप निर्माण झाला आहे. विविध संघटना त्या विरोधात मोर्चा काढून निवेदन देत आहेत. शनिवारी विविध दलित व इतर अनुसूचित जाती-जमातीच्या संघटनांनी कित्तूर चन्नम्मा चौक येथे उत्तरप्रदेश मुख्यमंत्र्यांच्या पुतळय़ाचे दहन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

उत्तरप्रदेश येथील एका वाल्मिकी समाजातील मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा देशामध्ये खळबळ उडाली असून या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारविरोधात बेळगाव जिह्यातून विविध संघटना आंदोलन करू लागल्या आहेत.

शनिवारी कर्नाटक वाल्मिकी युवा वेदिका, डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघ, अखिल भारतीय महिला सेवा संघ, भीम आर्मी यासह इतर संघटनांनी हे आंदोलन केले. कित्तूर चन्नम्मा चौक येथे प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी पेटविलेला तो पुतळा पोलिसांनी विझविण्यासाठी प्रयत्न केले. तातडीने पोलिसांनी आग विझवून प्रतिकात्मक पुतळा बाजूला नेला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रकांत कोलकार, मारुती कोलकार, साहील मेत्री, लक्ष्मी मेत्री, उमेश कोलकार, शिवानंद कोलकार, शंकर दोडमनी, सीमा इनामदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Related Stories

तालुक्यात मोठय़ा उत्साहात लक्ष्मीपूजन

Amit Kulkarni

सार्वजनिक वाचनालयातर्फे समितीच्या कोविड सेंटरला 21 हजार रुपये मदत

Amit Kulkarni

गुंजी माउलीदेवी मंदिर दसरोत्सवापूर्वी पूर्णत्वाकडे

Amit Kulkarni

श्रीपंत महाराज पुण्यतिथी उत्सव साधेपणाने साजरा

Patil_p

आई पॉझिटिव्ह, मुलगी निगेटिव्ह

Patil_p

माजी उपमुख्यमंत्र्यांच्या कारचा अपघात

mithun mane