Tarun Bharat

उत्तरप्रदेशातील ‘राजकारणा’त दरवळणार सुगंध

अखिलेश यादवांकडून ‘समाजवादी परफ्यूम’ लाँच

वृत्तसंस्था  / लखनौ

उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीवरून आता तयारीला वेग आला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंगळवारी ‘समाजवादी इत्र’ नावाने परफ्यूम लाँच केला आहे. या परफ्यूममुळै 2022 मध्ये द्वेषभावना संपणार असल्याचे उद्गार सप आमदार पुष्पराज जैन यांनी काढले आहेत.

हे अत्तर कन्नौजचे सप आमदार पम्मी जैन यांनी तयार केले आहे. हे अत्तर तयार करण्याठी 2 वैज्ञानिकांना 4 महिन्यांचा कालावधी लागला आहे. यात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या 22 नैसर्गिक सुंगंधीद्रव्यांचा वापर करण्यात आला आहे. या अत्तराचा शिडकटावा केल्यास तुम्हाला समाजवादाचा सुगंध जाणवेल, बंधुभाव जाणवू लागेल आणि कन्नौजच्या मातीचाही यात वापर करण्या आला असल्याचे जैन यांनी म्हटले आहे.

आणखी एक नैसर्गिक अत्तर तयार करणार असून ते 2024 मध्ये सादर करण्यात येईल आणि ते पूर्ण देशातील द्वेषाचे वादळ हटविण्याचे काम करणार असल्याचे सप नेत्याकडून म्हटले गेले. याच्या सुगंधाचा प्रभाव 2022 मध्ये दिसून येईल, हा परफ्यूम समाजवादी विचारसरणीची आठवण करून देत राहणार असल्याचे उद्गार अखिलेश यांनी काढले आहेत.

Related Stories

मुरघा मठाधीशांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

Patil_p

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू , १० जखमी

Archana Banage

दुबईतील रॉयल गोल्ड बिर्याणी

Patil_p

100 हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

Patil_p

पत्थलगडीला विरोध, 7 जणांची हत्या

Patil_p

गणेशोत्सव मंडळांना आता तीन दिवसांत परवानगी

Patil_p