Tarun Bharat

उत्तरप्रदेशात बसखाली चिरडून 18 मजुरांचा मृत्यू, 25 जखमी

ऑनलाईन टीम / लखनऊ : 

अयोध्या-लखनऊ महामार्गावर बाराबंकी येथे एका ट्रकने बंद पडलेल्या डबलडेकर खासगी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बससमोर झोपलेल्या 18 मजुरांचा चिरडून मृत्यू झाला तर 25 हून अधिक जण जखमी झाले असून, त्यांना लखनऊमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील लुधियाना येथून मजुरांना घेऊन जाणारी डबलडेकर खासगी बस मंगळवारी रात्री हायवेवर बाराबंकी जिल्ह्यातील रामस्नेहायत कोतवाली भागात बंद पडली होती. त्यामुळे बसमधील मजूर बस समोर झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री एका ट्रकने या बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बस पुढे झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेल्याने 18 मजुरांचा चिरडून मृत्यू झाला. या अपघातात 25 हून अधिक जखमी झाले आहेत. 

Related Stories

“अविवाहित लोकांच्या हातात देश; आणि ते लग्नाचं वय ठरवणार”

Abhijeet Khandekar

आजपासून राजस्थानमध्ये लॉकडाऊनबाबत नवीन नियमावली

Tousif Mujawar

अर्थव्यवस्था सुदृढतेच्या दिशेने अग्रेसर

Patil_p

कोरोना काळात रेल्वे विभागामुळे खादी उद्योगाला मिळाली चालना

Archana Banage

‘जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चाइना’, राहुल गांधींनी मोदी सरकारची उडवली खिल्ली

Archana Banage

‘एक देश, एक रेशनकार्ड’मुळे सर्वसामान्यांना बळ

Amit Kulkarni