Tarun Bharat

उत्तरप्रदेशात ‘भंगार’ धोरण लागू

ऑनलाईन टीम / लखनऊ :

देशात ‘भंगार’ धोरण लागू करणारं उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं आहे. या कायद्यानुसार विशिष्ट कालावधीनंतर जुनी वाहने वापरता येणार नाहीत. रस्त्यावरील अनफीट वाहने तपासणी पथकांच्या हाती लागल्यानंतर ती जप्त करुन थेट भंगार केंद्रात पाठवण्यात येणार आहेत. त्याची योग्य किंमत वाहनधारकांना दिली जाईल. लखनऊचे परिवहन आयुक्त धीरज साहू यांनी हे धोरण तातडीने लागू केले आहे.

या भंगार धोरणानुसार, 15 वर्षे जुनी पेट्रोल आणि 10 वर्षे जुनी डिझेल वाहनं फिटनेसशिवाय रस्त्यावर धाऊ शकणार नाहीत. पण जर अशी अनफीट वाहनं तपासणी पथकालाच्या हाती लागली तर ती जप्त करुन भंगार केंद्रात पाठवली जाणार आहेत. भंगारात पाठवलेल्या अशा वाहनांची योग्य ती किंमत वाहन मालकाला मिळणार आहे.

या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यात भंगार केंद्रे सुरू होणार आहेत. सरकारनं निश्चित केलेल्या नियमांनुसार जर वाहनांचं वय उलटून गेलं असेल तर लोकांना या ठिकाणी स्क्रॅपसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी परिवहन विभागानं ऑनलाईन नोंदणीही सुरु केली आहे.

Related Stories

मिताली राज ‘दस हजारी’ मनसबदार

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

datta jadhav

सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला नोटीस ; तुमचा कोव्हिडबाबत‘नॅशनल प्लॅन’ काय?

Archana Banage

‘कृष्णकुंज’मध्ये कोरोनाचा शिरकाव; राज ठाकरेंसह 3 जण पॉझिटिव्ह

datta jadhav

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची मोदींनी केली पाहणी

Patil_p

दिल्लीत भाजपला बहुमत मिळणार : स्वामी

Patil_p