Tarun Bharat

उत्तरप्रदेशात 40 टक्के महिलांना उमेदवारी; प्रियंका गांधींची घोषणा

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केली आहे. ज्या महिलांना उत्तरप्रदेशात सकारात्मक बदल घडवायचा आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, देशाला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचं आहे. उत्तर प्रदेशमध्ये बदलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांनी पुढे यावे. माझा निर्णय उत्तर प्रदेशच्या प्रत्येक महिलेसाठी आहे महिलांना तिकीट जातीच्या आधारावर नाही तर पात्रतेच्या आधारावर दिले जाईल. आम्हाला उमेदवार मिळतील, आम्हीही लढू. जर तुम्ही या वेळी मजबूत नसलात तर पुढच्या वेळी तुम्ही मजबूत व्हाल. 2024 मध्ये यापेक्षा जास्त महिलांना संधी मिळू शकते. माझ्या हातात असते तर 50 टक्के तिकीट महिलांना दिले असते. या निर्णयामुळे महिला शक्ती एकवटेल. लडकी हूँ, लड सकती हूँ असा नाराही त्यांनी दिला.

Related Stories

गुंतवणूकदारांचे ‘रेड कार्पेट’ घालून स्वागत

Patil_p

संजय अरोरा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त

Patil_p

कमांडर जगदीशच्या विरोधात सीबीआयचे आरोपपत्र

Patil_p

गोरखपूरचा हल्लेखोर झाकीर नाईकचा चाहता

Patil_p

अयोध्या : हनुमानगढीच्या महंतांची विटांनी ठेचून हत्या

datta jadhav

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Abhijeet Khandekar