Tarun Bharat

उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी बसप झाला डिजिटल मायावतींचा डिजिटल प्लॅन

Advertisements

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरीही राज्यात कोरोना संक्रमणही वाढत चालले आहे. अशा स्थितीत बसप प्रमुख मायावती यांनी स्वतःच्या सर्व प्रचारसभांना डिजिटल स्वरुप देण्याचा निर्णय घेतला आहे. सभांना डिजिटलाइज्ड करण्याच आराखडा तयार करण्यात येतोय. यांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एलईडीपासून सर्व प्रभारी नेत्यांचे ट्विटर तसेच फेसुबक अकौंट व्हेरिफाय करविले जात आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बसप अध्यक्षा मायावती यांनी स्वतःच्या सभांना डिजिटल बळ देण्यास सुरुवात केली आहे. यात प्राथमिक स्तरावर सर्व जिल्हा प्रभारी नेत्यांचे सोशल मीडिया अकौंट व्हेरिफाय करविण्यात येत आहे. मायावती यांचे संबोधन सुरू असताना या व्हेरिफाइड अकौंटशी लिंक टॅग जोडला जाणार आहे, ज्यानंतर जनता देखील अशाच व्हेरिफाइड अकौंटद्वारे बसप अध्यक्षांचे भाषण ऐकू शकणार आहे.

मायावतींच्या संबोधनावेळी जिल्हा पक्ष कार्यालयांमध्ये मोठमोठय़ा एलईडी आणि स्क्रीन्स लावल्या जाणार आहेत. यामुळे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱया क्षेत्रीय लोकांना कार्यालयाबाहेर जमवून मायावतींचे भाषण ऐकविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हय़ातील पक्ष कार्यालयात ही व्यवस्था केली जात आहे.

बसप अध्यक्षा मायावती जेव्हा सभांना संबोधित करतील, तेव्हा एक लिंक सर्व जिल्हा प्रभारी नेत्यांना शेअर करण्यात येणार आहे. यापूर्वी सर्व प्रभारी नेते स्वतःच्या कार्यालयांमध्ये लोकांना जमविणार आहेत. भाषणाची लिंक शेअर करत प्रत्येक व्यक्तीला त्याच्याशी जोडले जाऊ शकणार आहे.

एचडी प्रसारण होणार

अनेक टप्प्यांमध्ये झूम तसेच अन्य ऍपद्वारे मायावती यांच्या प्रचारसभेचे प्रसारण केले जाणार आहे. याचबरोबर हे प्रसारण एचडी गुणवत्तेचे असणार आहे, यामुळे श्रोत्यांना मायावतींचा आवाज स्पष्ट ऐकू येणार आहे. याकरता सर्व जिल्हय़ांच्या पदाधिकाऱयांना निर्देश देण्यात आले आहेत.

Related Stories

स्वातंत्र्यदिनासाठी गाईडलाईन्स

Patil_p

ख्राइस्टचर्च हल्ला : गुन्हेगाराला जन्मठेप

Patil_p

माजी खासदार कमल सिंगांचे निधन

Patil_p

गोगोई यांच्यासंबंधी खटला रद्दबातल

Amit Kulkarni

राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथीची शक्यता; सचिन पायलट 22 आमदारांसह दिल्लीत

datta jadhav

गुजरातमध्ये कलम ३७० च्या नावाने भरणार क्रिकेट टुर्नामेंट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!