Tarun Bharat

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना कोरोनाची लागण

  • परिवारातील 4 सदस्यांना देखील संसर्ग 


ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या परिवारातील चार सदस्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. 


त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी, माझी पत्नी, मुलगी, सुमित रावत आणि पुरन रावत आम्ही कोरोनाची टेस्ट केली होती. त्यांनतर आम्ही सर्वजण पॉझिटिव्ह आलो आहोत. त्यामुळे काल पासून जे कोणी आमच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. कारण तसेच आपण आपली काळजी घेणे आवश्यक आहेे, असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


दरम्यान, रावत यांनी नुकतीच  कोरोनाची पहिली लस टोचून घेतली होती. त्यानंतर देखील त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 


तसेच रावत हे मंगळवारी देहरादून मधील होळी मीलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर रावत यांना कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांच्या सोबत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना देखील संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. 

Related Stories

भोंग्यांसंदर्भातील बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट करत राज ठाकरेंनी सेनेला डिवचले

datta jadhav

तृणमूल काँग्रेसकडून अनुसूचित जातींचा अपमान

Patil_p

मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन : शरद पवार

Tousif Mujawar

पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; 7 टप्प्यात होणार निवडणुका

datta jadhav

Paytm चे CEO विजय शेखर शर्मा यांची जामिनावर सुटका

Archana Banage

राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘जुलाई आ गया, वैक्सीन नहीं आयी’

Archana Banage