Tarun Bharat

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांना कोरोनाची लागण

Advertisements

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. 


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, सध्या माझी प्रकृती ठीक आहे आणि मला कोणताही त्रास नाही आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी स्वतः आयसोलेट केले आहे. मागील काही दिवसांपासून जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आपली काळजी घ्यावी आणि आवश्यकता असल्यास स्वतः ची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. 


दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना रविवारी कोरोनाची लागण झाली आहे. लोकसभा अध्यक्ष 14 मार्च रोजी कनखल येथील हरिहर आश्रममध्ये हवन यज्ञात सहभगी झाले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत, भाजप प्रदेश अध्यक्ष मदन कौशिक, राज्य मंत्री यतिश्र्वरानंद आदी त्यांच्या संपर्कात आले होते.  

Related Stories

फिलिपाईन्समध्ये पूर अन् भूस्खलन

Patil_p

राज्यात लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय -आरोग्यमंत्री राजेश टोपे

Archana Banage

देशात 30,005 नवे बाधित; 442 मृत्यू

datta jadhav

‘अल-कायदा’च्या दोघांना 12 दिवस पोलीस कोठडी

Patil_p

दारूवर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना टॅक्स’

datta jadhav

आतापर्यंत देशात साडेतीन कोटी बाधित

Patil_p
error: Content is protected !!