Tarun Bharat

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांचा राजीनामा; भाजप आमदारांची आज बैठक

नवी दिल्ली /प्रतिनिधी

चार महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी पक्षनेतृत्वाने रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्या आदेशानुसार रावत यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावत यांचा राजीनामा महत्वाचा मानला जात आहे. नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज भाजप आमदारांची बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता राजभवनावर जाऊन राज्यपाल बेबी रानी मौर्या यांच्याकडे आपला राजीनामा दिला. रात्री ९.३० वाजता बोलावलेल्या पत्रकार परिषदेत रावत यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबत माध्यमांना माहिती दिली. तीरथसिंह रावत यांच्याकडे ४ महिनेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी होती.

तीरथसिंग रावत यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.मी माझा राजीनामा राज्यपालांना सादर केला आहे. घटनात्मक संकट पाहता मला राजीनामा देणे योग्य आहे असे वाटले. मला आतापर्यंत प्रत्येक संधी दिल्याबद्दल मी केंद्रीय नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी यांचे आभारी आहे असे रावत यांनी म्हटले.

Related Stories

जम्मू काश्मीर : शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Tousif Mujawar

पार्टनरकडून प्रेयसीची निर्घृण हत्या

Patil_p

भारत बायोटेक : लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी 8 हजार स्वयंसेवकांची नियुक्ती

datta jadhav

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे राजीनाम्याचे संकेत

Archana Banage

त्रिपुरात डावे-काँग्रेस यांच्यात मतभेद

Patil_p

रविकिरण इंगवले याच्यासह ४० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल; राजेश क्षीरसागर म्हणाले, …तर ठोकून काढलं असत

Archana Banage