Tarun Bharat

उत्तराखंडमध्ये ढगफुटी

दुकानांची हानी प्राणहानीचे वृत्त नाही, बचाव कार्याला प्रारंभ

देवप्रयाग / वृत्तसंस्था

उत्तराखंडमधील देवप्रयाग येथे अचानक झालेल्या ढगफुटीमुळे मालमत्तेची हानी झाली आहे. 10 ते 12 दुकाने मुसळधार वृष्टीत वाहून गेली आहेत. मात्र, जीवीत हानी झालेली नाही, असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले. मंगळवारी सकाळपासूनच या भागात पावसाचा जोर होता. तो दुपारनंतर प्रचंड प्रमाणात वाढला.

संध्याकाळी 5 वाजता ढगफुटी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर आपत्तीनिवारण विभागाने त्वरित बचाव कार्य सुरू केले. राष्ट आपत्तीनिवारण विभागाचे पथके देवप्रयाग येथे धाडण्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. ढगफुटीचा विस्तार फारसा नसल्याने स्थिती लवकर नियंत्रणात आल्याचेही सांगण्यात आले. कोरोना निर्बंधांमुळे या शहरात दुकाने बंदच होती. परिणामी, हानी केवळ मालमत्तेची झाली. काही रस्तेही वाहून गेले आहेत.

पाणीपातळीत वाढ

रात्रीपर्यंत पाऊन ओसरला असला, तरी देवप्रयाग व परिसरातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे प्रशासन सावध असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पाण्याची पातळी वाढत राहिल्यास ते सखल भागांमधील घरांमध्ये शिरण्याची शक्यता असून  आपत्तीनिवारण कर्मचाऱयांना सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला. आज बुधवारी दुपारपर्यंत स्थिती स्पष्ट होईल.

आठवणी ताज्या

काही महिन्यांपूर्वी याच राज्यातील चमोली येथे हिमनदी फुटल्यामुळे आलेल्या महापुरात 200 हून अधिक लोक ठार झाले होते. तर गेल्या मsिहन्यात याच राज्यातील चीनच्या सीमेलगतच्या भागात हिमनदी फुटल्यामुळे 8 जणांना प्राणास मुकावे लागले होते. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Related Stories

”उत्तरप्रदेश विधानसभा : काँग्रेस सत्तेत आल्यास १० लाखांपर्यंत मोफत उपचार,आणि बरंच काही…”

Archana Banage

सिलिंडरची किंमत लवकरच ‘हजार’पार ?

Amit Kulkarni

मुहूर्त टेडिंग सत्रात 524 अंकांचा वधार

Patil_p

बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्याचे प्रयत्न

Patil_p

कर्नाटक राज्यात उच्चांकी 2798 कोरोना रुग्णांची भर

Patil_p

अयोध्येत पाच हेक्टर जमीन मालकाविना

Patil_p