ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. गुरुवारी उत्तराखंडात 47 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3305 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, काल 1847 नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर देहरादून जिल्ह्यात 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन आरोग्य कर्मचारी, चार दिल्लीतील, नोएडा 1, गजियाबाद 1, गुरुग्राम 2, यमुनानगर 1, मुंबई 1, मथुरा 1 मधून आले होते. तर 6 जणांची कोणत्याही प्रकारची प्रवास हिस्टरी नाही आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील 3305 रुग्णांपैकी आतापर्यंत 2672 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.85 टक्के इतके आहे. तर सध्या 536 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.