ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. मागील 20 दिवसात रविवारी पहिल्यांदाच उत्तराखंडात एका दिवसात 120 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये 5 आरोग्य कर्मचाऱ्यांचा ही समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने 3500 चा टप्पा ओलांडला आहे. तर हल्द्वानी मेडिकल कॉलेजमध्ये एका 54 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला,अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, काल 2131 नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर ऊधमसिंह नगरमध्ये 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन आरोग्य कर्मचारी, पंजाब 1, गुरुग्राम 1, दुबई 1, पश्चिम बंगाल 1, बरेली 2, दिल्ली 6, मुरादाबाद 3, नेपाल मधील 2 तर सिकांदराबादमधून एक जण आला होता तर 18 जण संपर्कात आले होते. त्यातील दोघांची कोणत्याही प्रकारची प्रवास हिस्टरी नाही आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील 3537 रुग्णांपैकी आतापर्यंत 2786 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.77 टक्के इतके आहे. तर सध्या 674 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.