Tarun Bharat

उत्तराखंडात कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजाराच्या उंबरठ्यावर

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. रविवारी उत्तराखंडात 230 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9632 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, काल 3283 नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 0, बागेश्र्वर 0, चमोली 1, चंपावत 7, देहरादून 34, हरिद्वार 127, नैनिताल 16, पौरी गरवाल 3, पिथोरगड 0, रुद्र प्रयाग 8,तेहरी गरवाल 11, यू एस नगरमधील 19 आणि उत्तरकाशीमधील 4 जणांचा समावेश आहे. 


दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण 9632 रुग्णांपैकी आतापर्यंत 6132 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.68 टक्के इतके आहे. तर सध्या 3334 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

सहा कोटी वर्षांपूर्वीच्या खडकस्तंभाचा शोध

Patil_p

स्कूल बसला अपघात, पण…

Patil_p

दिल्ली : आंदोलनात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; मृतांची संख्या 10 वर

datta jadhav

‘सितरंग’ बांग्लादेशकडे वळणार

datta jadhav

गुजरातमधील भाजपच्या खासदाराचा पक्षाला रामराम

Patil_p

Monsoon Update : मान्सून अंदमानात दाखल

Archana Banage