Tarun Bharat

उत्तराखंडात कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 1.38 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक बनत चालली आहे. प्रदेशात पहिल्यांदाच मागील 24 तासात 3 हजार 998 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्ण संख्येने 26 हजारचा टप्पा पार केला आहे. तर आजच्या काल 1744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 38 हजार 010 इतकी झाली आहे. यातील 1 लाख 6 हजार 271 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी 32,448 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 1564 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 666, नैनिताल 434, उधमसिंह नगर 523, टिहरी 139, चमोली 29 पिथोरागडमध्येे 38, पौडीमध्ये 229, बागेश्वर 34 आणि चंपावतमध्ये 72 , अल्मोडा 112, रुद्रप्रयाग 74 आणि उत्तरकाशीमध्ये 84 रुग्ण आढळून आले आहेत.

प्रदेशात सद्य स्थितीत 115 झोन आहेत. सद्य स्थितीत 26,980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1972 ( 1.43 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 % इतके आहे. 

Related Stories

अनिल अंबानी यांच्या कंपनीसमोर नवी अडचण

Patil_p

वधू मिळविण्यासाठी शहरात झळकविली पोस्टर्स

Patil_p

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला कोरोनाची लागण

Archana Banage

लाच घेणाऱ्या अधिकाऱयाला तत्काळ शिक्षा द्या : मनिष सिसोदिया

prashant_c

उत्तरप्रदेश पोलिसात 20 टक्के मुलींची भरती होणार

datta jadhav

राजस्थानात त्वरित मुख्यमंत्री बदला !

Amit Kulkarni