Tarun Bharat

उत्तराखंडात कोरोनाबाधितांनी ओलांडला 71 हजारांचा टप्पा

Advertisements

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात 466 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 71 हजार 256 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, काल 8616 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 466 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 5, बागेश्र्वर 5, चमोली 16, चंपावत 7, देहरादून 181, हरिद्वार 53, नैनिताल 40, पौरी गरवाल 65, पिथोरगड 38, रुद्र प्रयाग 04,तेहरी गरवाल 14, यू एस नगरमधील 23 आणि उत्तर काशीमधील 15 जणांचा समावेश आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे काल 251 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 65,102 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.36 टक्के इतके आहे. तर सध्या 4 हजार 368 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

दिल्लीतील कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय घट; सद्य स्थितीत 10,178 ॲक्टिव्ह रुग्ण

Rohan_P

ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधलेला नाही- भारतीय पुरातत्व विभाग

Abhijeet Shinde

26 रोजी भारत बंदची हाक

Patil_p

भावांनी सोडले, काकडीने तारले

Patil_p

कोरोनाग्रस्तांसाठी ओडिशाकडून देशातील सर्वात मोठे रुग्णालय

tarunbharat

93 वर्षीय साहित्यिक, 8 दिवसांत कोरोनावर मात

Patil_p
error: Content is protected !!