Tarun Bharat

उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 1380 वर

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडमध्ये सोमवार दुपार पर्यंत कोरोनाचे 25 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1380 वर पोहचली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या 25 रुग्णांमध्ये बागेश्वर, चंपावत आणि रुद्रप्रयोग मधील प्रत्येकी दोन, चमेली, देहरादून, नैनिताल व ऊधमसिंह नगर मध्ये प्रत्येकी एक, पौडीमध्ये चार, टिहरी मध्ये तीन आणि हरिद्वार मधील आठ जणांचा सहभाग आहे. तसेच हरिद्वार मध्ये आढळलेल्या एका रुग्णाला सोडून बाकी सर्व रुग्ण उत्तराखंडी आहेत. 


दरम्यान, उत्तराखंड राज्यात आता पर्यंत 663 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Related Stories

चीन, युरोपमध्ये कोरोना रुग्णवाढीनंतर केंद्राचा राज्यांना अलर्ट

Archana Banage

दिल्लीत भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

datta jadhav

रॅपिड टेस्टिंग किटबाबत पूर्ण सहकार्य करू; चीनची भूमिका

prashant_c

कोरोना चाचण्या चोवीस तास करा!

Patil_p

महाराष्ट्रात 3427 नवे कोरोना रुग्ण, 113 मृत्यू

datta jadhav

सेवाक्षेत्राच्या ‘उड्डाणा’साठी…- कॅप्टन नीलेश गायकवाड

Amit Kulkarni