Tarun Bharat

उत्तराखंडात कोरोना रुग्णांनी पार केला 75 हजारांचा टप्पा

Advertisements

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात 473 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 7 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 75 हजार 265 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, काल 11,701 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 473 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 32, बागेश्र्वर 14, चमोली 43, चंपावत 10, देहरादून 164, हरिद्वार 40, नैनिताल 24 पौरी गरवाल 26, पिथोरगड 51, रुद्र प्रयाग 04, तेहरी गरवाल 25, यू एस नगरमधील 24 आणि उत्तर काशीमधील 16 जणांचा समावेश आहे. 

  • 68,365 रुग्ण कोरोनामुक्त!


दिलासादायक बाब म्हणजे काल 538 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशात 68,365 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.83 टक्के इतके आहे. तर सध्या 4 हजार 947 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

लॉक डाऊन पूर्णपणे फेल, पंतप्रधानांनी पुढील रणनीती सांगावी : राहुल गांधी

Rohan_P

तणाव सामोपचाराने सोडविण्यावर भर

Patil_p

पंजाब : शेतकरी आंदोलनात सहभागी न झाल्यास 5 हजारांचा दंड

datta jadhav

देशात 38,617 नवे कोरोना रुग्ण; 474 मृत्यू

datta jadhav

हरयाणात 30 जून पर्यंत च्युईंगम विक्रीवर बंदी 

prashant_c

सीएएचा मुस्लिमांना धोका नाही

Patil_p
error: Content is protected !!