Tarun Bharat

उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांच्या उंबरठ्यावर

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात 515 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 13 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 79 हजार 656 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, आज 10,671 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 515 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 4, बागेश्र्वर 24, चमोली 30, चंपावत 07, देहरादून 171, हरिद्वार 45 नैनिताल 56 पौरी गरवाल 52, पिथोरगड 48, रुद्र प्रयाग 16, तेहरी गरवाल 21, यू एस नगरमधील 18 आणि उत्तर काशीमधील 23 जणांचा समावेश आहे. 

  • आतापर्यंत 1320 मृत्यू 

दिलासादायक बाब म्हणजे काल 425 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशात 71,966 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.35 टक्के इतके आहे. तर सध्या 5 हजार 456 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1320 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 512 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

जम्मूमध्ये पाडले पाकिस्तानी ड्रोन

Patil_p

बालकांना कोव्हॅक्सिन देण्यास मान्यता

Patil_p

मुस्लीम विचारवंतांशी सरसंघचालकांचा संवाद

Amit Kulkarni

दोन दिवसांच्या मंदीनंतर शेअरबाजारात जोरदार उसळी

Patil_p

मुस्लीम लीगचा बालेकिल्ला, कम्युनिस्ट हार्ट लँड

Amit Kulkarni