Tarun Bharat

उत्तराखंडात दिवसभरात 200 नवे कोरोना रुग्ण

  • सद्य स्थितीत 1115 रुग्णांवर उपचार सुरु 


ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात 200 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. रुग्ण वाढीच्या मानाने रुग्ण कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. कालच्या दिवसात 49 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 98,880 इतकी झाली आहे. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 11,848 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज  हरिद्वारमध्ये सर्वात जास्त म्हणजे 71, देहरादून जिल्ह्यात 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर नैनिताल 22, उधमसिंह नगर 14, अल्मोडामध्ये एक, पौडी, रुद्रप्रयाग आणि टीहरीमध्ये प्रत्येकी आठ – आठ, पिथोरागडमध्ये 5 रुग्ण आढळून आले आहेत. 


सद्य स्थितीत 1115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण 94, 634 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1706 (1.73 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.71 % इतके आहे. 

Related Stories

मध्यप्रदेशात विषारी दारूचे 20 बळी

Patil_p

घर खरेदीदारांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

Patil_p

फुटिरवादी नेता शब्बीर शाह विरोधात कारवाई

Patil_p

भारताला लवकर सोपविणार एस-400

Patil_p

न्यायाधीश एस. ए. नजीर सेवानिवृत्त

Patil_p

प्रेमजाळ्य़ाऐवजी अडकली ‘सीमा’जाळ्य़ात!

Patil_p